Download App

‘जनता हुशार आणि स्वाभिमानी, दोन मिनिटांत भाषण गुंडाळावं लागलं’; रोहित पवारांची बोचरी टीका

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar on Chhagan Bhujbal : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या होमपीचवर काल अजित पवार गटाची भव्य सभा झाली. शरद पवार यांच्यानंतर बीडमध्ये सभा घेत अजित पवार गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी जाहीर सभेतून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच टार्गेट केलं. पवारांवर टीका केल्यामुळं कार्यकर्ते संतापले होते. त्यांनी भाषणादरम्यानचा गोंधळ घातला. त्यामुळं पुढील काही मिनीटातच भुजबळांना आपले भाषण आवरतं घ्यावं लागलं. दरम्यान, भुजबळांनी केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.

रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिलं की, बीडमध्ये मोठं स्वागत झालं, पण एका मंत्र्याने त्याासठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजेरआड करता येणार नाही. या सभेत जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्यानं संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेव्हा भाजपाची आरती गायली गेली तेव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, त्यातच सर्व आलं…. कारण बारामती असो की बीड… संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं, असं रोहित पवार म्हणाले.

भुजबळांची टीका-
पवारांची नाशिकची सभा, कोल्हापूर-बीडची सभा, पवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, खैरनार यांचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर भुजबळांनी पवारांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, तेलगी स्टॅम्प प्रकरणात माझ्यावर आरोप झाल्यानंतर माझा राजीनामा घेण्यात आला होता, मग खैरनार यांनी आरोप केल्यानंतर आपण राजीनामा का दिला नाही, दादा कोंडके यांच्यासारख डबल मिनिंग जोक करू नका, अशी टीका केली.
बारामतीच्या प्रश्नावर अजितदादा आमचे नेते असल्याचे सांगितलं जातं. जर तुमचे नेते वाटत असतील तर ते पक्षाचे उपमुख्यमंत्री असल्याची घोषणा करा, असा टोलाही त्यांनी लगावला. दादांनी सकाळी शपथ घेतला, तर म्हणे गुगली टाकली होती, राजकारणातही अशी गुगल असते का? असा सवाल त्यांनी केला.

Tags

follow us