Download App

युवकांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार मैदानात, पुणे ते नागपूर काढणार युवा संघर्ष यात्रा

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली. राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे युवा, डिग्री असूनही हाताला काम नसणारे विद्यार्थी, हे सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता रोहित पवार (Rohit Pawar) मैदानात उतरले आहेत. यासाठी ते युवा संघर्ष यात्रा (yuva Yuva Sangharsh Yatra) काढणार आहेत. ही यात्रा 24 ऑक्टोबर म्हणजेच 10 दसऱ्यापासून सुरू होणार आहे.

हवेत झेप घेत विराटचा अप्रतिम झेल, ऑस्ट्रेलियाचा इनफॉर्म बॅटसमन तंबूत 

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार युवकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झाले आहेत. अशातच त्यांनी युवा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. नुकताच रोहित पवार यांनी या युवा संघर्ष यात्रेचा प्रोमो आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला. य बेरोजगारी, परीक्षा शुल्क वाढ, पेपर फुटी, युवा आत्महत्या, कंत्राटी भरती या सगळ्यांना जबाबदार कोण? असा सवाल या प्रोमोच्या माध्यमातून केला. प्रश्न आपले… सरकार झोपले… असं कॅप्शन देत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वी सरकारने परीक्षा शुल्कात मोठा वाढ केली. सरकारी शाळा बंद करण्याचं सरकारचं धोरण आहे. अलीकडेच सरकारने कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचाही जीआर काढला. शासनाच्या या सर्व धोरणांना राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. अनेक जिल्ह्यात युवक सरकारच्या निर्णयाना विरोध करत आहेत. मात्र, युवकांच्या प्रश्नांकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळेच स्पर्धा परीक्षांना बसणारे युवा, उत्तीर्ण होऊनही बेरोजगार असलेले उमेदवार, कंत्राटी पध्दतीने सुरू केलेली नोकरीभरती हे सगळे प्रश्न घेऊन रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले. पुणे ते नागपूर असा या यात्रेचा मार्ग असणार आहे. या पदयात्रेत युवकांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही या प्रोमोतून करण्यात आलं.

येत्या २४ तारखेला पुण्यातून या पदयात्रेला प्रारंभ होईल. या पदयात्रे दरम्यान, शरद पवार मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत, असं रोहित पवार यांनी सांगितलं. कंत्राटी भरती स्थगित करावी. तलाठी भरती व इतर परीक्षांसाठी असलेले वाढीव शुल्क रद्द करावे. दत्तक शाळांचा आदेश रद्द करावा, अशा मागण्या या पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

 

 

Tags

follow us