Download App

रुपाली चाकणकरांना आमदार व्हायचं, ‘या’ जागेवरून लढणार निवडणूक

Rupali Chakankar has hinted to contest the 2024 assembly elections : पुढील वर्षात लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) होणरा आहेत. त्यामुळं आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणुक लढण्याचे संकेत दिले आहेत.

रुपाली चाकणकर यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितलं की, गेल्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केला होता. मी अर्ज केला त्याच दिवशी उमेदवारांच्या मुलाखती होत्या. माझी मुलाखत होती. मात्र, त्याच दिवशी मला महिला आयोगाचा कार्यभार मिळाला. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले नाहीत. पण 2024 च्या निवडणुकीत मी नक्कीच उमेदवारी मागणार आहे, असं त्या म्हणाल्या.

Wrestlers Protest : भाजपची एक तरी महिला खासदार बोलली…. प्रीतम मुंडेंचे धाडस

चाकणकर म्हणाल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. त्यामुळे मी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे उमेदवारी मागणार आहे. मी खडकवासला मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. मला 2019 च्या निवडणुकीत उमेदवारीबद्दलही विचारण्यात आलं होतं. पण तेव्हा मीच नाही म्हणाले होते. कारण, मला महिला आयोगाची जबाबदारी देण्यात आली होती.

इंडिक टेल्स वेबसाईटवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त लिखान करण्यात आल्यानं या वेबसाईटवर बंदी घालावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. याविषयी चाकणकर यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून अशा घटना सातत्याने होत आहेत. समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केली जात आहेत. समाजातील संघर्ष तीव्र होईल, असा खोटा इतिहास लिहिल्या जात आहे. हे का केल्या जातंय, हे कळत नाही. मात्र, हे चूक असून याला आळा बसणं गरजेचं आहे. त्यामुळं अशा व्यक्तींवर कारवाई होणं गरजेच आहे, असं चाकणकर यांनी सांगितलं.

Tags

follow us