Sachin Ahir Anti Defection Law: ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांना फोडून आपल्या गोटात घेतलेच शिवाय विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधकांकडे सभागृहात संख्याबळ नसल्याने सचिन अहिर यांची निवड होणार आहे. सचिन अहिर हे शिंदे गटात गेले आहेत. पण त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. या पळवाटेचा फायदा अहिर यांना झाला आहे.
शिंदेंचा थेट ‘मातोश्री’ला धडक देण्याचा प्लान; अहिरांना फोडत आता लक्ष्य वरळी किल्ला
या पक्षांतरबंदी कायद्याच्या पळवाटेचा फायदा अहिर यांनी कसा घेतला त्याबाबत कायदेतज्ज असिम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. पक्षांतर बंदी कायद्यात दहाव्या अनुसूचिच्या परिच्छेद 5 नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष – उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेच्या सभापती – उपसभापती आणि विधान सभेच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष या पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आलेली आहे.
सचिन अहिर एकटे आमदार पक्ष सोडून गेले तरीही पक्षांतर बंदी कायद्याच्या परिच्छेत 5 नुसार अहिर यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळाले आहे. जो आहे तो कायदा असा आहे. मी दरवेळी कायदा आणि संविधानच सांगितले असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.
बारावीही अनुत्तीर्ण, अभ्यासात रस नसल्याने तिने… सिया गोयलच्या आईचा खुलासा, चेतनबाबत काय म्हणाल्या?
विधान परिषदेत ठाकरे गटाचे सहा आमदार होते. आता सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंकडे फक्त पाच आमदार उरले आहेत. अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, ज. मो. अभ्यंकर, सुनील शिंदे हे आमदार हे ठाकरेंकडे राहिले आहे. उपसभापतीपदावर असताना नीलम गोऱ्हे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनीही पक्षांतरबंदी कायदा लागू झाला नव्हती. या कायद्यातील पळवाटेचा मोठा फायदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उठविला आहे. दरम्यान उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीतर्फे जगन्नाथ अभ्यंकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
