Sambhaji Briged On Gopichand Padalkar : पडळकर तुम्ही विनाकारण पिसाळल्यासारखं करू नका, ज्या व्यक्तीला अक्कल नाही त्याचं नाव गोपीचंद पडळकर असल्याचं म्हणत संभाजी ब्रिगेडने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा चांगलाच वचपा काढलायं. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी संभाजी ब्रिगेडवर कडाडून टीका केली होती. एक ब्राह्मण चुकला मग सगळ्यांना शिव्या का? असा खडा सवाल पडळकरांनी केला होता. त्यावर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी आपली भूमिका मांडलीयं.
पुढे बोलताना संतोष शिंदे म्हणाले, गोपीचंद पडळकर किती फडणवीस यांचे तळवे चाटणार? एवढाच ब्राह्मणांचा पुळका येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी सोलापूरकर, कोरटकरच का असतात? याचा अगोदर विचार करा? ब्राह्मणांचा एवढाच ओळख असेल तर जात बदलून घ्या. इतिहासावर अभ्यास करून नवीन शोधल्याशिवाय काही सापडत नाही. पडळकर म्हणतात संभाजी ब्रिगेड रोज नवीन इतिहास शोधून काढते? इतिहासाचे नवनवीन संदर्भ समोर येत आहेत, ज्यांनी इतिहास खोटा मांडला, बदनाम केला, दम असेल तर त्यांना जाऊन प्रश्न विचारा? विनाकारण थोबाडवर करून बोलायची गरज नाही. अन्यथा एक दिवस तुमचाही फकीर झोळी येऊन पळून जाईल, असं संतोष शिंदे यांनी स्पष्ट केलं.
तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार; आजचे राशीभविष्य एका क्लिकवर…
तसेच आमदारकीच्या तुकड्यासाठी फडणवीस यांनी पडळकर यांना वाचाळ बोलायला पुढे केलेला आहे, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. खरं तर ज्या पडळकरांनी बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करणार नाही, असं जाहीर भाषणात सांगितलं होतं, तेच पडळकर दल बदलू आहेत. धनगर समाजाला फसवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम हा पडळकर यांचा आहे. शरद पवारांचा आणि संभाजी ब्रिगेडचा काडीचाही संबंध नाही, गरज पडली तर शरद पवारांना जाऊन विचारा, पडळकर यांनी पिसाळल्यासारखं करू नये, अन्यथा नसबंदी करायला फडणवीस साहेबांना सांगावं लागणार असल्याचं संतोष शिंदे म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते आमदार पडळकर?
संभाजी ब्रिगेड मधील लोकांना माझा सवाल आहे की, तुमच्या आई-बापाचं लग्न ब्राह्मणांनी लावलं, मग त्यांनी बायको सोडायची का? तुमचं लग्न देखील ब्राह्मणांनी लावलं मग तुम्ही बायको सोडणार आहात का? तुमच्या घरभरणीची वास्तुशांती ब्राह्मणांनी केली मग तुम्ही घर पाडणार का? मराठा समाजात देखील काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होते. त्या पद्धतीची प्रवृत्ती त्या समाजात देखील होती. परंतु, इतर मराठा समाजातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ताकतीने लढत होते. म्हणून ती संपूर्ण जात चुकीची नसते. एखादा ब्राह्मण चुकीचा असू शकतो म्हणून सगळ्यांना शिव्या देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल आमदार पडळकरांनी संभाजी ब्रिगेडला केला होता.