मुंबई : महाविकास आघाडीच्या काळात जी विकासकाम सुरू होती. त्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने महाविकास आघाडीचे काही आमदार हे हायकोर्टात गेलेले आहेत. त्यांनी त्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांचा देखील समावेश आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच त्यामागील कारणं देखील समजलेले नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी तेथील सत्ताधारी पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर आरोप केले की, आमचे स्थानिक नेते मिडीयापुरतेच मर्यादीत आहेत. ते लोकांच्या मनात आणि घरात नाहीत. त्यामुळेच ते विकासकाम थांबवत आहेत. कारण त्यांना विकासाची दिशा नाही. तसेच त्यांना बाष्कळ गप्पा मारण्याची सवय आहे. अशी टीका कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांनी विजय शिवतारे यांच्यावर केली आहे. पुणे आणि बारामतीवर भाजप शिवसेनेचा झेंडा फडकणार असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
दरम्यान मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून आमदार निधी वाटपाबाबात घाई केली जात आहे. याबाबत आता मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे.
हायकोर्टाचा शिंदे-फडणवीसांना धक्का, आमदार निधी वाटपाला स्थगिती
राज्यात विकास निधी वाटपाच्या याचिका प्रलंबित असल्याने मुंबई हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. तर ही स्थगिती नव्या अर्थिक वर्षातील आमदार निधीच्या वाटपाला देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच गेल्या वर्षी केलेल्या आमदार निधी वाटपावर स्पष्टीकरणामध्ये कोणाला किती निधी दिला ? याचे तपशील कोर्टाने मागवले आहेत.