“निवडून येण्यासाठी मला फक्त १०० फोन करायचे आहेत. कारण माझ्याकडे असे १०० कार्यकर्ते आहेत ते मला प्रत्येकी ५ हजार मते आणून देतील. त्यावर मी खासदार म्हणून निवडून येईल.” असा विश्वास माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीमध्ये संजय काकडे यांनी कसबा पोटनिवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय भविष्य यावर रोखठोक मते व्यक्त केली. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा : Sanjay Kakade: सातवी पास संजय काकडेंचा सत्ता दरबारात शिरकाव कसा….अनकट संजय काकडे
मुलाखतीमध्ये संजय काकडे यांच पुढील राजकीय भविष्य काय यावर बोलताना काकडे म्हणाले की, “मी याआधी अपक्ष निवडणून आलो होतो, आज पुन्हा अपक्ष निवडून येऊ शकतो. पण देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीखातर आणि बाकी भाजप नेत्यांच्या सोबत माझी मैत्री आहे. मी सध्या भाजपात आहे. त्यामुळे आज मला वैयक्तिक निर्णय सांगता येत नाही. आज मी पक्षात आहे आणि त्यामुळे पक्ष सांगेल तो निर्णय घेईल किंवा पक्ष माझ्यासाठी योग्य ती जबाबदारी देईल.”
हेही वाचा : Sanjay Kakade : कसब्याचा पराभव कोणामुळे? चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे
पण पुढे त्याच प्रश्नांवर पुणे लोकसभा लढणार का ? असा प्रश्न विचारल्यावर मी नक्की निवडून येईल असं म्हणत त्यांनी विजयचा प्लॅन देखील सांगितला. ते म्हणाले की, “पक्षाने तर २०२४ साठी पुणे लोकसभासाठी संधी दिली तर मी नक्की निवडून येईल. कसं निवडून यायचं हे मला नक्की माहित आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की निवडणुकीसाठी मी पूर्णपणे तयार आहे.”
ते म्हणाले की, “निवडून येण्यासाठी मला फक्त १०० फोन करायचे आहेत. कारण माझ्याकडे असे १०० कार्यकर्ते आहेत ते मला प्रत्येकी ५ हजार मते आणून देतील. त्यावर मी खासदार म्हणून निवडून येईल. बाकी त्याला पक्षच्या तीन लाख मतांची जोड आहे. त्यामुळे मी नक्की निवडून येईल.” त्यामुळे संजय काकडे यांनी पुणे लोकसभेसाठी स्वतः मैदानात असल्याचं सांगितलं आहे.