Sanjay Raut On Gulabrao Patil : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथे 23 एप्रिल रोजी सभा होणार आहे. पण या सभेच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे सभेच्याआधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या जोरदार निशाणा साधला आहे. तसेच या सभेला जळगाव, पाचोरा,रावेल या ठिकाणाहून मोठ्यासंख्येने शेतकरी व शिवसैनिक येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कोण गुलाबराव त्याला विसरा आता. काही वर्षांपूर्वी गुलाबो गँग नावाचा सिनेमा आला होता, असे म्हणत त्यांनी गुलाबरावांवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल
दरम्यान काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. जर माझ्यावर संजय राऊत सारखा माणूस बोलेल तर मी त्या सभेत घुसेल, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तसेच मी यासंदर्भात एसपींना निवेदन देखील देणार आहे. त्यांनी चौकटीत बोलावं अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेल अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी राऊतांना सज्जड दम दिला होता.
धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…
यानंतर राऊतांनी देखील तितक्याच जोरदारपणे गुलाबराव पाटलांना उत्तर दिले आहे. आम्ही त्यांची वाट बघतोय. सभेत घुसा आणि परत जाऊन दाखवा, असे म्हणत राऊतांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जळगावच्या सभेआधीच शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष दिसून आला आहे.