कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालेला आहे. यावरुन राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. कसब्यामध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपची झोप उडाली असल्याची टीका राऊतांनी केली आहे. यावेळी ते कोल्हापूर येथे बोलत होते.
कसब्यामध्ये भाजपचा पराभव झाल्याने त्यांना आता घाम फुटला आहे. त्यांना आता झोप लागत नाही, त्यांची थोडी फार जी झोप होती ती देखील उडाली आहे, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपचा विजय झाला असे मी मानत नाही. त्याठिकाणी आमच्याच उमेदवाराला बंडखोर म्हणून उभे केले होते, असे राऊत म्हणाले आहेत.
Kasba By Election : एका विजयाने हुरळून जाऊ नका, मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीला टोला
यावेळी त्यांनी शिंदे गटावर देखील राऊतांनी निशाणा साधला. ज्या शिवसेनेने त्यांना विधानसभा व लोकसभा दाखवली तिथे त्यांनी परत जाऊन दाखवावे असे आव्हान राऊतांनी शिंदे गटाच्या आमदार व खासदारांना दिले आहे. तसेच धनुष्य नीट उचला ते रावणाने देखील उचलले होते, पण ते त्याच्या अंगावर पडले. रामायणातून हा धडा समजून घ्या, अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली आहे. यावेळी मागच्यावेळे पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान काल झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मतांनी पराभव केला आहे. तर पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत.