छत्रपतींनी हाती ‘मशाल’ धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; शाहू महाराजांच्या उमेदवारीवर राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना ( Shahu Maharaj ) उमेदवारी देण्याच्या चर्चांदम्यान ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले की, शाहू महाराज यांची लोकसभेच्या जागेसाठी लढण्याची चर्चा मी स्वतः कोल्हापुरात जाऊन करेल. छत्रपती यांनी हातात मशाल धरली तर आम्हाला आनंदच […]

Sanjay Raut छत्रपतींनी हातात 'मशाल' धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; शाहू महाराजांच्या उमेदवारीवर राऊतांनी स्पषच सांगितलं

Sanjay Raut

Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना ( Shahu Maharaj ) उमेदवारी देण्याच्या चर्चांदम्यान ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले की, शाहू महाराज यांची लोकसभेच्या जागेसाठी लढण्याची चर्चा मी स्वतः कोल्हापुरात जाऊन करेल. छत्रपती यांनी हातात मशाल धरली तर आम्हाला आनंदच आहे, महाराष्ट्र उजळून निघेल.

Sanjay Raut : गडकरी दिल्लीत नको म्हणून आताच त्यांचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र; राऊतांचा भाजपवर घणाघात

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, कोल्हापूरची जागा ही शिवसेनेने जिंकलेली जागा आहे. जिंकलेल्या जागेवर चर्चा करायची नाही हे जागा वाटपातल सूत्र आहे. शाहू महाराज यांचा विषय आम्ही राज्यसभेसाठी घेतला होता. शाहू महाराज यांची लोकसभेच्या जागेसाठी लढण्याची चर्चा अद्याप आमच्या सोबत झाली नाही आहे. काँग्रेसने काय सांगितले आहे हे मला माहित नाही.

यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ची गाडी सुसाट, तर ‘लापता लेडीजच्या कमाईला ब्रेक

आम्हाला शाहू महाराज यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना विचारावे लागेल, विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का? छत्रपती शाहू यांना आम्ही मानतो त्यांचा प्रचंड मान आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे. की शिवसेनेच्या उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये यावे. आमच्यावर दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये, 30 वर्षापासून या ठिकाणी शिवसेना जागा लढवत आहे. छत्रपती यांच्याशी मी स्वतः कोल्हापुरात जाऊन या विषयावर चर्चा करेल. छत्रपती यांनी हातात मशाल धरली. तर आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्र उजळून निघेल. असं म्हणत राऊत यांनी शाहू महाराजांना उमेदवारी देण्याच्या चर्चांदम्यान ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान नुकतच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शाहू महाराज यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याच्या विषयावर तिनही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. मात्र ते कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यात आता राऊत यांनी शाहू महाराजांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर लढावे अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

Exit mobile version