Sanjay Raut On PM Narendra Modi Criticism:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः जाहीर केलं पाहिजे ते हिंदुहृदय सम्राट आहेत की नाहीत. मुळात त्यांचा पक्ष राहील की नाही तेच माहित नाही. एकनाथ शिंदे गट व अजितपवार गट हे भविष्यात भारतीय जनता पक्षात विलीन होऊन कमल चिन्हावर निवडणुका लढवणार आहेत. त्यांनी स्वतःला किती पदव्या लावून घेतल्या तर महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही, लोकं जोड्याने मारतील. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड उद्या अमेरिकेत गेले तर तिथे पदव्या लावतील. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) असे अनेक नेते दुसऱ्या पक्षातून घेऊन निर्माण केले, ते सर्व तात्पुरते आहे, असा खोचक टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.
आता एकनाथ शिंदे हिंदुरुदय सम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदय सम्राट म्हणून असं काय महान कार्य त्यांनी केलं आहे, ते आम्हाला पाहावे लागणार आहे. आज इतकी वर्ष बाळासाहेब ठाकरे सन्माननीय हिंदुहृदय सम्राट यांच्याबरोबर काम केले, त्यांचा संघर्ष पहिला हिंदुत्वासाठी त्यांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत, बेइमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदुरुदय सम्राट म्हणण्याची नवीन परंपरा नव्या हिंदुत्वात सुरू झाली असेल तर हे पहावं लागेल. हिंदुहृदय सम्राट म्हणून एक स्वातंत्र्यवीर सावरकर व दुसरे बाळासाहेब ठाकरे हे लोकांनी मानले आहेत. त्यांचा त्याग मोठा आहे जागृती आणण्याचे काम या दोघांनीच केले आहे. असे राऊत यावेळी म्हणाले.
राजस्थान मधील लोकांना महाराष्ट्रात काय चाललंय माहिती नाही. महाराष्ट्रात त्यांना कोणी विचारत नाही म्हणून बाहेर प्रचार करत आहेत. राजस्थानला प्रचारासाठी खोके घेऊन गेले असतील. महाराष्ट्रामध्ये ज्यांना पनौती समजलं जातं ते बाहेर जाऊन प्रचार करत आहेत,त्यांना इथे कोणीही विचारत नाही. महाराष्ट्रातून पनौती बाहेर जात आहे. भाजप ने हा शब्द मनावर घेतला नाही पाहिजे, कारण पनौती हा शब्द विश्वामध्ये वापरला जातो आणि देशात देखील पनौती शब्दाचे एवढी नफरत भाजपला झाली नाही पाहिजे. तुम्ही नेपाळ आणि बनारस मध्ये जा आणि पनौती त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
Maharashtra Politics : अजितदादांच्या दोन शिलेदारांंनी वाढवली शिंदे सरकारची डोकेदुखी?
गेल्या चार दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात जवानांना बलिदान द्यावा लागले. याबाबत पंतप्रधान, गृहमंत्री आणि सर्वोच्च मंत्री यांच्याकडून संवेदना व्यक्त केली गेली नाही. संपूर्ण केंद्र सरकार पाच राज्यांमध्ये निवडणुका घडवण्यात दंग आहेत. त्यांना काँग्रेसला आणि राजकीय विरोधकांना उकडून फेकायचा आहे. त्यांना काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. त्यांना शिवसेना मुक्त भारत करता आलं नाही ,त्यांच्याकडून झालं नाही. कश्मीरमध्ये मध्ये अतिरेकी कारवाया संपल्या नाहीत, कुठे आहेत पंतप्रधान कुठे आहेत गृहमंत्री? कश्मीर पंडित आम्ही त्यांची घर वापसी करू काय झालं त्याचं? नोटबंदी कुठे गेली? असाही सवाल संजय राऊत यांनी विचारला.