Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मोदींना मन की बात करायला वेळ आहे. पण जरांगेंना एक फोन कॉल करायला वेळ नाही. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे. अशी टीका राऊतांनी केली आहे.
मन की बातसाठी वेळ पण जरांगेंना फोन करण्यासाठी नाही
मराठा आरक्षणावरून मोदींवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्याच हातात आहे. परंतु नरेंद्र मोदी हे प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. अमित शाह मिझोराम मध्ये फिरत आहेत आणि महाराष्ट्र पेटलेला आहे. जरांगे पाटलांच्या जीवाच बरं वाईट झालं, तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्री वरून बोललं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे.
IFFI: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सरकारकडून 3 मराठी सिनेमाची घोषणा
दरम्यान राऊतांनी भाजपवर पुढे बोलताना म्हटले की, भाजप आता भारतातील प्रत्येक विरोधकांवर अशी कारवाई करत आहे. भाजप ने ठरवलं तर सर्व विरोधकांना कारवाईत खेचतील. पण फक्त हे 2024 पर्यंत, त्या नंतर बघू. ह्या सरकार मध्येच किती लोक आहेत की ज्यांना जेल मध्ये टाकलं पाहिजे. हे लोक जरांगे पाटलांकडे जाऊन काय करणार?
लढा ‘सत्तेचा’ नाही तर ‘सत्याचा’; Rohit Pawar यांची सडेतोड मुलाखत
पण काही ठोस पर्याय निघणार का? ह्या लोकांनी काही खास असे उपाय निघाले पाहिजे, त्यांनी काढले पाहिजे. जरांगे पाटलांचा विषय संपवायला सरकारला अजून किती वेळ हवा आहे? सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणाच्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या.