Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आज सुनावणीला उपस्थित राहतील. पक्षाचा संस्थापक, अध्यक्षच उपस्थित राहणार असल्याने निवडणूक आयोगाचीच आज खरी परीक्षा ठरणार आहे, असे राऊत म्हणाले. खासदार राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य केंद्र सरकारवर टीका केली. तसेच निवडणूक आयोगातील सुनावणी होण्याआधीच मोठे वक्तव्य केले.
ते म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) आजच्या सुनावणीला उपस्थित राहतील असं दिसतंय. आम्हीही आमच्या सुनावणीला हजर राहिलो होतो. सुनावणीवेळी आयोगाचे तीन सदस्य समोर असतात. ज्या पक्षाच्या अध्यक्षावरच खटला दाखल केला आहे, की आमचा पक्ष खरा आहे. त्यांचा खरा नाही. आता त्या पक्षाचेच अध्यक्ष समोर बसलेले असताना आयोगाची भूमिका काय असेल, शरद पवारांनी पक्ष स्थापन केलाय. त्यांनी लोकांना पदं दिली, निवडून आणलं. कुणीतरी ऐरागैरा समोर उभा राहतो आणि सांगतो हा त्यांचा पक्ष नाही. त्यामुळे आज निवडणूक आयोगाची खरी कसोटी आहे, असे राऊत म्हणाले.
‘डोंबिवलीत लढूनच दाखवा बघूया, किसमें है कितना दम’; आदित्य ठाकरेंना श्रीकांत शिंदेंचं चॅलेंज!
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना एकाच निर्णयाच्या आधारावर न्याय मिळेल. आमच्या प्रकरणातही निवडणूक आयोगाला निकाल फिरवावा लागेल. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की आमदार खासदारांची फूट म्हणजे पक्षातली फूट नाही. हाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला व आम्हालाही लागू होईल. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था राजकीय दबावाखाली काम करतात. राज्यकर्त्यांना पाहिजे तसे निर्णय देतात. देशाच्या राजकारणाला लागलेली ही कीड आहे, असे राऊत म्हणाले.
नक्षलवादाच्या समस्येसंदर्भात राजधानी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. नाव नक्षलवादाचं आहे पण, कारण वेगळं आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय राज्यात मागील चार दिवसांत 100 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. हा गंभीर विषय मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ करत नसेल तर मला वाटतं त्यांचं मन आणि हृदय मेलेलं आहे. दिल्लीवाल्यांच्या मन की बात ऐकायला ते येतात पण, नांदेड, संभाजीनगर अनेक जिल्ह्यांत जे मृत्यूचं तांडव सुरू आहे त्यांचा आक्रोश त्यांना ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय त्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झालेत, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.
Mumbai News : डेक्कन एक्सप्रेस पकडताना कल्याण स्थानकावर अपघात; एकाचा मृत्यू