Download App

मी धमक्यांना भीक घालत नाही, ज्यांना धमक्या येतात ते पक्ष सोडतात, राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Eknath Shinde and Devendra Fadnavis : गेले 40 – 45 वर्ष अशा कित्येक धमक्या आल्या मी त्याला भीक घालत नाही. जे अशा धमक्यांना जे घाबरतात ते पक्ष सोडतात. दुसऱ्या पक्षात जातात असा टोला यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांना लगावला. ते आज मुंबई Tak च्या चावडीमध्ये बोलत होते. त्यांना विचारले की धमकी येते तर मग तुम्ही गुन्हा दाखल नाही केला का? यावर बोलताना राऊत म्हणतात मुळात धमकी येते म्हणजे हे सरकारच अपयश आहे. असे म्हणत राऊतांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रशचिन्ह उपस्थित केले. (Sanjay Raut criticized Eknath Shinde and Devendra Fadnavis)

पुढे बोलताना राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाणाक्ष म्हणून त्यांना हिणवलं. असे गृहमंत्री असताना देखील धमकी कशी येते असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला. धमकीची माहिती संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परंतु तशी अधिकृत कुठलीही तक्रार राऊतांनी नोंदवली नसल्याचे यावेळी सांगितले.

थुंकण्याच्या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणतात रस्त्यावर थुंकण्यास बंदी आहे. तोंडावर थुंकण्यास कुठली बंदी आहे. परंतु तो विषय संपला आहे आता नको तो विषय असे म्हणत संजय राऊतांनी थुंकण्याचा विषय संपवला.

राधाकृष्ण विखेंनी डिवचलं, संजय राऊतांनी स्वत:लाच धमकी दिली असेल…

अजित पवारांशी असलेल्या संघर्षाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणतात माझा अजित पवार किंवा पवार कुटुंबियांशी कुठलाही संघर्ष नाही. राजकारणमध्ये या गोष्टी होत असतात त्या जास्त मनाला लावून घायच्या नसतात असे संजय राऊत अजित पवारांच्या वरील वक्तव्यावर बोलले. अजित पवार यांच्या विषयी माझी चूक झाली असे राऊतांनी यावेळी कबूल केले.

यावेळी प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत यांनी अतिशय सावध भूमिका घेतल्याचे दिसले त्यांना अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न जेव्हा केला. त्यावेळी राऊत म्हणतात आम्ही आता लोकसभेची तयारी करत आहोत. विधानसभेचे पुढचे पुढे पाहू.

Tags

follow us