Sanjay Raut : दिल्ली पोलिसांच्या विशेषपथकाने गुरुवारी न्यूज क्लिक या (News Click Raid) वृत्तसंस्थेशी संबंधित पत्रकारांच्या घरी छापेमारी केली. तसेच आज सकाळी आप खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा टाकत शोधमोहिम सुरू केली. या दोन्ही कारवायांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल करत काही टोचणारे सवाल केले आहेत. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे केंद्रातील सरकार आणि भाजपवर आगपाखड केली. ईडीच्या कारवाायांवरून सरकारला सवाल केले.
नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला मुश्रीफांची भेट, ‘प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होणार’
पत्रकारांवर कारवाई केली, चीनकडून फंडिंग मिळते अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला, हे हास्यास्पद आहे. बेडरपणे हे पत्रकार सरकारला प्रश्न विचारण्याचे काम हे पत्रकार करतात. चीन हस्तक्षेप करत आहे, त्याबाबत तुम्हाला राग येत नाही असा सवाल करत पत्रकारांवर धाडी टाकणे हे चुकीचेच आहे, असे राऊत म्हणाले. आणीबाणीचे तुम्ही प्रत्येक वर्षी श्राद्ध घालता. आणीबाणीच्या काळात देखील असं झालं नव्हतं. ईडीच्या धाडी आप खासदार संजय सिंह यांच्यावर देखील घातल्या गेल्या. आम्ही देखील त्यांच्यातून होरपळून बाहेर पडलो आहोत. यंत्रणाच फास आवळत आहे. अटक करताना कुठलेही कारण देत नाही. ईडीचे लोक अंडरवर्ल्ड डॉन सारखे येतात, घुसतात आणि अटक करतात. पण,आता 2024 ला सर्वांचा हिशोब होणार आहे, असा गर्भित इशारा राऊत (Sanjay Raut) यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देत राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, राज्यात मृत्यूचे तांडव सुरू असताना एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना त्याची काहीच चिंता नाही. हे लोक फक्त राजकारणातच अडकले आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली.
Bacchu Kadu : ‘मला भाजपाचा खूप त्रास’; बच्चू कडूंच्या आरोपाने वादाची ठिणगी
राज्याला या लोकांनी बीमारू राज्य बनवून टाकले आहे. महाराष्ट्र राजकीय पॉलिटिकल बीमार राज्य झाले आहे. महाराष्ट्राला बीमारू राज्य बनवले गेले हे काही बरोबर नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या कॅबिनेट आणि दिल्ली दौऱ्यातील गैरहजेरीवर प्रतिक्रिया दिली.