Sanjay Raut : अग्रलेखात चुकीचे लिहिले ते अजितदादांनी सिध्द करावं

Sanjay Raut on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा कडक शब्दांत […]

Untitled Design (10)

Untitled Design (10)

Sanjay Raut on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा कडक शब्दांत टीका केली होती. अजितदादांच्या त्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार यांच्याविषयी वावड्या उठत आहेत. असे सामनाच्या आग्रलेखात लिहिले होते पण सामनात आग्रलेख लिहिण्याअगोदर चर्चा सुरु होत्या. त्या वावड्या थांबवल्या पाहिजेत असं लिहिले होते. ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. नागपूरच्या सभेत भाषण केलं पाहिजे. लोक तुमची भूमिका ऐकायला आले आहेत, असं मी त्यांना सांगितले होतं. आम्ही विमानात एकत्र होतो. त्या लेखावर आम्ही चर्चा केली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Atiq Ahmed : अतिक अहमदचं राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होणार होतं ‘सेकंड होम’?

संजय राऊत म्हणाले की, गेली 45 वर्ष झाली मी पत्रकारीतेत आहे. त्यामुळे मला माहिती आहे काय लिहियाचे? काय कोट करायचे? शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे अशा सगळ्या नेत्यांना मी कोट करतो. मी बरोबर बोललो, बरोबर लिहिले आहे. मी कधीही माझ्या विधानापासून माघार घेतली नाही. मी काय चुकीचे बोललो ते त्यांच्या पक्षाकडून कोणीतरी येऊन सांगावं. अजितदादांनी सिध्द करावं मी काय चुकीचे बोललो. पवारसाहेबांशी यावर चर्चा करावी, असे अवाहन संजय राऊत यांनी अजित पवार यांना केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 200 लढाई लढल्या. त्यापैकी 150 लढाई स्वकीयांविरुध्द लढल्या आहेत. हे अजित पवार किंवा पवार कुटुंबाबद्दल लिहिले नाही. हा इतिहास आहे. पवार कुटुंब म्हणजे वज्रमुठ आहे. त्यावरुनच आम्ही सभेला वज्रमूठ हे नाव दिले. अजित पवारांनी माझे लिखान पुन्हा वाचायला हवं. त्यांना हे कोणी सांगितले आहे की वाचले आहे हे मला माहिती नाही. माझ्या लिखानाविषयी वाद होतील. सत्य मांडले की वाद होतात. माझी टीका केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भाजपवर होती, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Exit mobile version