Download App

Sanjay Raut criticizes BJP : हिंमत असेल तर निवडणुका घ्या…राऊतांनी दिले थेट चॅलेंज

Sanjay Raut criticizes BJP : घटनाबाह्य सरकारचा पोपट मेला आहे, मात्र ते त्यांना परत ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करत आहे. आता पोपट कोणाचा उडतो हे फडणवीसांना लवकरच कळेल. हिंमत असेल तर तुम्ही फक्त निवडणुका घ्या, महानगरपालिका निवडणुका घ्या. मग पोपट कोणाचा मेलाय आणि गर्जना कोणत्या वाघाची होते हे कळेल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये जे दिसले ती एक झलक होती. असा थेट इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

Cannes 2023: असा भंगार ड्रेस कोण घालतं ? कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकची उडवली खिल्ली

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी बोलताना राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. दरम्यान राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या पुणे येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीबाबत देखील भाजपची चांगलीच खिल्ली उडवली. समोर नेत्यांचे भाषण सुरु होते अन यांचे लोक समोर झोपले होते. या बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते, त्यांचे फोटोही समोर आले आहेत. झोपलेल्या लोकांसमोर यांचे भाषण सुरु होते, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

गौतमी पाटील ‘या’ कारणामुळे वादात सापडण्याची शक्यता

अंधारेंवर हल्ला…राऊत म्हणाले
गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा‎ अंधारे या बीडमधील सभेच्या मैदानाची व‎ तयारीची पाहणी करत असताना‎ जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व‎ अंधारे यांच्यात वाद झाला होता. दरम्यान अंधारे यांच्या कानशीलात लगावल्याचा दावा देखील जाधव यांनी केला होता. दरम्यान बीडमध्ये झालेल्या या प्रकारानंतर अप्पासाहेब जाधव यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना (Sanjay Raut) राऊत म्हणाले, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाची शिस्त असते. शिस्त भंग करणाऱ्यांवर कारवाई करणे योग्यच आहे. सुषमा अंधारे पक्षाच्या उपनेत्या आहेत. त्यांच्यावर आरोप केल्याने पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आले आहे.

Tags

follow us