Download App

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दौंडच्या कारखान्याचं ऑडिट पाठवले आहे. आमची लढाई राहुल कुल (Rahul Kul) यांच्याविरोधात नाही. भिमा पाटस कारखान्याचे (Bhima Patas Sugar Factory) चेअरमन ज्यांनी 500 कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांच्या चौकशीची मागणी आम्ही करतोय. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पुराव्यासह 10 पत्र पाठवली. भेटीची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायचे आहेत. पण त्यांना वेळ नाही. कोणत्या नशेत हे सरकार फिरत आहे. भांग मारतात की अजून काही, असा हल्लाबोल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकावर केला आहे.

संजय राऊत पुढं म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशभरात विरोधी पक्षातील अनेक नेते किरकोळ कारणांनी तुरुंगात गेले. प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षातील आमदार किंवा प्रमुख माणूस सापडला की त्याविरोधात कारवाई केल्या आहेत. त्यानंतर मी दोन प्रकरणे समोर आणली. आता मंत्री असलेले दादा भुसे यांनी कारखाना बचाव या मोहिमेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये जमा केले. कारखाना उभाराला नाही मग पैसे कुठं गेले? त्यांच्यावर चौकशीची मागणी केली तर म्हणाले की आम्ही नशेत आहेत मग आमच्यावर आरोप करायचे त्यावेळी ते कोणत्या नशेत होते? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

शेतकरी कृती समितीने एक सभा लावली आहे. ती शेतकऱ्यांची लढाई आहे. त्यासाठी आम्ही जाणार, संजय राऊत यांनी दौंड येथील सभेविषयी ठणकावून सांगितले. ते पुढं म्हणाले की भिमा पाटस कारखान्याचे चेअरमन आणि दादा भुसे यांच्यावर चौकशी करून कारवाई करणार नसाल तर महाराष्ट्रात ज्या विरोधी पक्षांतील नेत्यांवर खोटे एफआयआर दाखल करुन तुरुंगात टाकलेत त्यांच्यावरील सगळे गुन्हा मागे घ्यावे लागतील. नाहीतर यांच्यावर गुन्हे दाखल करा किंवा हे सरकार भ्रष्टाचारी लोकांना पाठिशी घालतंय हे जाहीर करा, असे अव्हान संजय राऊत यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून त्यांच्या पक्षातील नेते खुश आहेत. आपला सरदार आता गृहमंत्री झालाय. आम्हाला कोणी हात लाऊ शकत नाही. पण खरी अडचण सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना झाली आहे. ह्या सरकारला प्रमाणिकपणाची आणि लढणाऱ्यांची भिती वाटते आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. ते दौंड येथे माध्यामांशी बोलत होते.

Tags

follow us