“शेतकऱ्यांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पाच-पाच हजार फेकले”; संजय राऊतांचा संताप, सरकारला धरलं धारेवर!

Sanjay Raut Criticizes Maharashtra Government on Drought Relief; संजय राऊत यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर सडकून टीका केली.

Sanjay Raut Criticizes Maharashtra Government on Drought Relief

Sanjay Raut Criticizes Maharashtra Government on Drought Relief

Sanjay Raut Criticizes Maharashtra Government on Drought Relief: राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांना मिळणारी मदत आणि सरकारी खर्चात 20 टक्के कपात करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यावर 11 लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करत त्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे म्हटले. तसेच, सरकारी खर्चात कपात करायची असेल, तर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी, असेही राऊत म्हणाले.

राज्यात हवामानाचा डबल गेम! एका बाजूला उकाडा, तर दुसरीकडे महाराष्ट्रासह 16 राज्यांत वादळी पावसाचा इशारा

शेतकऱ्यांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी फक्त पाच हजार फेकलेत

“राज्याचे मुख्यमंत्री मोठमोठ्या घोषणा करून राज्य उत्तम चालल्याचा देखावा करतायत. पण त्यांना अजूनही राज्यात चाललेली विकासकामातील आर्थिक लूट थांबवता येत नाही. ठेकेदार आत्महत्या करतायत. त्यांच्या कामाचे 95 हजार कोटी रुपये दिले नाहीत. या राज्यावर 11 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना कसा करणार? दुष्काळाचा सामना करण्यासाठी 50 हजार कोटींची गरज आहे. शेतकऱ्यांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी फक्त पाच-पाच हजार फेकलेत, अशा शब्दात राऊतांनी टीका केली.

तिजोरीच्या लुटीतून आलेली संपत्ती सत्ताधाऱ्यांकडे आहे

पण या राज्यकर्त्यांकडे निवडणुका लढण्यासाठी जो अतिरिक्त पैसा लागतो, तो यांच्याकडे प्रचंड आहे. भाजपाकडे, शिंदे गटाकडे आहे, सुनेत्रा पवारांकडेही आहे. सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक लढण्यासाठी सुनेत्रा पवारांनी 30 कोटी खर्च केले. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिक्षकांना अर्धा तोळ्याचा सोन्याचा दागिना दिला जातो. पैठणी आणि सफारी सूटही दिला जातोय. मग हे राज्य गरीब आहे, असे कसे काय म्हणू शकतो?

राम शिंदेंनी आकडा फोडला! जिल्हा बँकेसाठी कर्जत तालुक्यातील मतदार सहलीला नेल्याची घोषणा; रोहित पवारांची टीका

राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. पण तिजोरीच्या लुटीतून आलेली संपत्ती मात्र सत्ताधाऱ्यांकडे आहे. सगळ्यात जास्त संपत्ती भाजपाकडे आणि शिंदे गटाकडे आहे. ही संपत्ती कशी आली, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा.

दुष्काळाच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये बसलेल्या मंत्र्यांचे खिसे जरी झटकले, तरी शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटी रुपये जमा होतील.

शेतकरी जगला काय आणि मेला काय

दुष्काळामुळे शेतकरी जगला काय आणि मेला काय, याविषयी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काही फरक पडत नाही. ते आपापले साखर कारखाने, उद्योग, ठेकेदार आणि कमिशन यांच्यामध्ये व्यस्त आणि मस्त आहेत.” असेही संजय राऊत म्हणाले.

दुकाने लुटली, जाळपोळ केली! फ्रान्समध्ये महागाईला आणि कमी पगाराला कंटाळून लोखो लोकं रस्त्यावर उतरली

यांच्या मंत्र्यांचा थाट पाहा

सरकारी खर्चात 20 टक्के कपात करण्याच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. “स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. यांचा आणि यांच्या मंत्र्यांचा थाट पाहा,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Exit mobile version