Download App

Sanjay Raut : मोदी व शाह यांनी जावेद अख्तर यांचे कौतुक करायला पाहिजे

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut )   यांनी गीतकार-लेखक जावेद अख्तर (Javed Akhatar )  यांचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील ( Pakistan ) फैज फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे. यानंतर राऊत जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे.

जावेद अख्तर यांचे अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हवे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह याचबरोबर सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी देखील अख्तर यांचे कौतुक करायला पाहिजे.  ज्या पद्धतीने जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर त्यांची धुलाई केली त्यासाठी हिंम्मत लागते.  इथे बसून पाकिस्तानला सुकी धमकी देणे ठीक आहे, पण पाकिस्तानमध्ये जाऊन अशी धमकी देणे, त्याला हिंमत लागते, अशा शब्दात राऊत यांनी अख्तर यांचे कौतुक केले आहे.

(महिला नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी; AAP आणि भाजपा परस्परांत भिडले, कारण काय..?)

तसेच मी सामनाच्या कार्यालयात नसताना पोलिसांनी सामना कार्यालयामध्ये येऊन चौकशी केली.  मी नसताना सामनामध्ये पोलीस घुसले आणि त्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेतले. त्यावेळी मी नाशिकला गेलो होतो.  पोलिसांनी तपासाच्या नावाखाली सामना कार्यालयात घुसून आणि दहशत निर्माण केली व कर्मचाऱ्यांवर खोटा दबाव आणण्याचे काम केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.  तसेच पोलिसांनी  हवे तसे कागद आधीच प्रिंट करून आणले होते, असेही राऊत म्हणाले आहेत.

यासंदर्भात मी  पोलीस आयुक्तांना परत पत्र लिहीत आहे की, पोलिसांनी कार्यालयात येऊन काय केलं, असे ते म्हणाले. तसेच या प्रकारावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार का असे विचारले असता यावर,  देवेंद्र फडणवीस देखील खोक्याखाली चिरडून काम करत आहेत. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

Tags

follow us