Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत

Sanjay Raut On Amit Shah Mumbai tour: महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूरमध्ये सभा घेतली जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून उद्या रविवार, 16 एप्रिलला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T174710.592

Sanjay Raut

Sanjay Raut On Amit Shah Mumbai tour: महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूरमध्ये सभा घेतली जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून उद्या रविवार, 16 एप्रिलला ही सभा होणार असून यासाठी आजच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नागपूरमध्या दाखल झाले आहेत.

दुसरीकडे राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे.

Amit Shah मुंबई दौऱ्यावर; राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे?

यावेळी संजय राऊतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर विचारले असता राऊत म्हणाले की, ‘ अमित शाह हे दौऱ्यासाठी येत नसून ते महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत. मुंबईत बसून ते सभा पाहतील कारण या सभेकडे देशाचे लक्ष आहे. नागपूरात ही सभा होत आहे. ते मुंबई मनपासाठी रणनिती आखायला आले आहेत का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, गेल्या 50 वर्षांपासून रणनिती आखली जात आहे. पण मुंबई महाराष्ट्राची आहे आणि मुंबईवर शिवसेनेचच वर्चस्व राहिलं.’

Exit mobile version