राऊतांनी थेट शिंदेंचा सातबाराच काढला; म्हणाले, सत्तारांच्या काळात…

Shivsena :  शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिवस आहे. त्यामुळे शिवसेना व ठाकरे गट या दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याअगोदर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत  शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. आज दोन नाही एकच वर्धापन दिन आहे, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापण दिन आहे, असे म्हणत […]

Letsupp Image   2023 06 19T122057.858

Eknath Shinde Sanjay Raut Abdul Sattar

Shivsena :  शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिवस आहे. त्यामुळे शिवसेना व ठाकरे गट या दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याअगोदर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत  शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. आज दोन नाही एकच वर्धापन दिन आहे, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापण दिन आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला सुनावले आहे.

बाळासाहेब सारख्यांचा विचार कधी मरत नाही आणि कधी चोरला जात नाही. अनेक चोर त्याकाळात निर्माण झाले बाळासाहेबांनी त्यांना ढेकणासारखे चिरडून टाकले. आता जे तुम्हाला दिसत आहे, त्यांची तीच अवस्था होईल, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच शिंदे गटाला शिवसेनेचे स्थापनादिवस माहित नाही. 59 वर्धापन दिन हा दाखला अब्दुल सत्तारांनी दिला का असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. तसेच 20 जून हा जागतिक गद्दारदिन म्हणून साजरा करण्यासाठी UNला पत्र लिहिणार, असा खोचक टोलादेखील त्यांनी लगावला.

Ayodhya Poul News : कोण आहेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ?

तसेच ५७ वर्ष शिवसेनेचे अग्निकुंड धगधगते आहे. शिवसेनेत अनेक चढउतार आले अनेक जण आले गेले. शिवसेना संपविण्याचा प्रयत्न झाला, पण शिवसेना वाढत राहिली. शिवसेना ही मुंबई – ठाणे बाहेर जाणार नाही म्हटले जायचे, पण शिवसेनेने दिल्लीत धडक मारली. हे फक्त बाळासाहेबांमुळे झाले, मोदी आणि शहांमुळे नाही, असे म्हणत त्यांनी शिंदेंना सुनावले. आज जो गट आमचे मोदी आणि शहा आमचे म्हणतात या सगळ्यांमुळे शिवसेना नाही, बाळासाहेब आणि शिवसैनिकांमुळे आहे, असेही ते म्हणाले.

बावनकुळे हे गांभीर्याने घेण्यासारखे राजकारणी नाहीत; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

काल गद्दार गटाचे मुंबईमध्ये होर्डिंग पहिले त्यावर 59 वा वर्धापन दिन लिहिले आहे, ज्यांना स्थापन दिवस माहित नाही, ते शिवसेनवर दावा सांगत आहेत. हा इलेक्शन कमिशनने दिलेला बोगस सातबारा आहे. सध्या अब्दुल सत्तारच्या काळात बोगस प्रकरणं वाढली आहेत. 59 वा वर्धापन दिन हा अब्दुल सत्तारने दिलेला सातबारा असल्याचे राऊत म्हणाले.

 

Exit mobile version