शिंदेंचे आमदार नाराज, काय गडबड आहे लवकरच कळेल; राऊतांच्या दावाने खळबळ

Sanjay Raut On Shinde Camp MLA :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिंदे गटामधील काही आमदारांचा गट हा नाराज असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्यात सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरुन देखील त्यांनी सरकारला सुनावले आहे. अयोध्येला जाताना एक […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T122216.153

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 10T122216.153

Sanjay Raut On Shinde Camp MLA :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिंदे गटामधील काही आमदारांचा गट हा नाराज असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्यात सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरुन देखील त्यांनी सरकारला सुनावले आहे.

अयोध्येला जाताना एक मोठ्या आमदारांचा गट हा गेला नव्हता. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार हे नाराज असल्याचे कळते आहे, असे राऊत म्हणाले आहेत. काहीतरी गडबड सुरु आहे, काय गडबड आहे ती लवकरच कळेल, असा गर्भित इशारा राऊतांनी दिला आहे. तसेच राज्यातील मंत्रीविस्तार हा कठिण आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Sanjay Raut : बेईमान लोकांना जनतेनं कपडे काढून रस्त्यावर चोपलं पाहिजे

शिंदे गटाचा दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता. आम्ही सुद्धा या आधी दर्शन घेतलेल आहे आणि त्यावेळी कालची टोळी देखील होती. पण आम्ही शक्ती प्रदर्शन केले नाही. ज्या रामाची आपण पूजा केली त्या रामाने वनवासात जाताना आपला भाऊ भरत याला राज्य दिलं आणि राज्य चालवताना भरतानं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपला संयम आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचे विचार अंमलात आणले. हा विचार किती लोकांना पटतो आणि पटला आहे मला माहित नाही, असे म्हणत त्यांनी शिंदेना टोला लगावला.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

तसेच शक्ती प्रदर्शन ठाण्याच्या नाक्यावर देखील होऊ शकते. तुम्ही विमानात ठाण्यातील गुंड घेऊन गेला होतात त्यांना शरयू तीरावर पवित्र करण्यासाठी घेऊन गेला होतात का? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version