Download App

PM Modi : भाजप पक्ष हा बोगस पदव्यांची फॅक्ट्री, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : पंतप्रधान मोदी यांची पदवी पवण्याचं काय कारण? गृहमंत्री अमित शाह यांनी समोर आणली होती. पण त्यावर अनेक लोकांनी शंका घेतली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदवीबद्दल सांगावे. काही दिवसांपूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या तपशीलाची मागणी केल्याबद्दल 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. ही कोणती पद्धत, पदवी पवण्याचं काय कारण? खरं तर पंतप्रधान मोदी यांची पदवी नव्या संसदेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावी. पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी सामनामध्ये पंतप्रधान मोदींच्या पदवीविषयी उपस्थित केलेल्या मुद्द्याविषयी विचारण्यात आले त्यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?

त्याचबरोबर पुढे संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या जास्तीत जास्त लोकांची पदवी बोगस आहे. भाजप हा पक्ष बोगस पदव्यांची फॅक्ट्री आहे. कोणत्याही 10 भाजप नेत्यांची यादी काढा. लगेच सत्य समोर येईल.

महाविकास आघाडीची रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाविद्यालयीन पदवी वादावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, “असे अनेक तरुण आहेत ज्यांच्याकडे पदवी आहेत पण नोकऱ्या नाहीत… पंतप्रधानांना पदवी दाखवायला सांगितल्यावर 25 हजारांचा दंड ठोठावला जातो.

ते पुढे म्हणाले, “मी आणि जयंत पाटील बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिकलो आम्ही मंत्री झालो तेव्हा आमच्या शाळेचा अभिमान वाटला. पंतप्रधानांना आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान का नसावा? कोणी पदवी दाखवा म्हटले तर पदवी दाखवली जात नाही. उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना सांगितले होते की, त्यांनी मागितलेली माहिती पंतप्रधानांच्या भूमिकेशी सुसंगत नाही. त्यात म्हटले आहे की पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा तपशील आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये आहे.

follow us