Download App

शरद पवारांबद्दल संभ्रम राहिल्यास फटका बसेल, मविआच्या बड्या नेत्याचं विधान

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

sanjay raut : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची काल एक गुप्त बैठक झाली. एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील ही दुसरी भेट होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचा उरलेला गटही सत्तेत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान, आता या भेटीबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाष्य केलं. (sanjay raut on sharad pawar and ajit pawar meeting)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या संदर्भात ही भेट होती. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटेले हे या सभेचे आयोजक आहेत. आज पटोले-ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या बाबतीत निर्माण झालेला संभ्रम फार काळ राहता कामा नये, असं विधान केलं. नेहमीच शरद पवारांच्या जवळचे असलेले संजय राऊत यांची भाषा बदलल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

काय म्हणाले संजय राऊत?
शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाली, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला हे खरे. असा संभ्रम वारंवार निर्माण होत आहे. पण हा भ्रम फार काळ राहता कामा नये. अशा भेटीमुळें आघाडीत चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. ही संभ्रमावस्था ताबडतोब संपवायला हवी. एकत्र बसून काही निर्णय घेणं गरजेचं आहे. फार काळ पवारांविषयी संभ्रम राहिल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, असं राऊत म्हणाले.

शरद पवार मोठे नेते आहे. जे भाजपसोबत गेले आहेत, ते जरी जवळचे नातेवाईक असले तरी कठोर निर्णय घ्यावे लागता. आम्हीही कठोर निर्णय घेतले, असं राऊत म्हणाले.

पटोलेंनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. याबाबत बोलतांना राऊतांनी सांगितलं की, आज नाना पटोले यांनी आमची भेट घेऊन झाली. या भेटीत इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाल्याचं ते म्हणाले.

तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित बैठकीबाबत स्पष्टता यावी, शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची भूमिका आहे. कारण पवारांच्या भूमिकेचा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो, असे पटोले यांना सांगण्यात आले.

दरम्यान, कालच्या गुप्त बैठकीवर आज शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे माझे पुतणे असल्याचे त्यांनी सांगितले. मग ते मला भेटले तर वावगं काय? असा सवाल त्यांनी केला. मात्र, तरीही या गुप्त बैठकीबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा सुरूच आहे

 

Tags

follow us

वेब स्टोरीज