कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापुरात पोहोचताच भाजप (BJP) व शिंदे गटावर (Shinde group) जोरदार हल्लाबोल केला. गद्दार गेल्यावर संघटन मजबूत होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज कोल्हापुरात मेळावा होत आहे. आज सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये होणाऱ्या या मेळाव्याला खासदार संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत.
कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर झाला. कायदा आणि पोलिस कोणाच्या मर्जीने चालत आहेत ? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. २०२४ ला या सगळ्यांचा हिशेब होणार, असा इशारा त्यांनी दिला. जनतेला गर्जनेला बळ देण्याकरिता आम्ही फिरत असल्याचे ते यावेळी म्हणाले. आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, यामुळे त्यांनी पदावरून काढलं, तरी आम्ही अशी पदे त्यांच्यावर ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ असल्याचा सुनावलं आहे.
गायींच्या मृत्यूवरून घणाघात
संजय राऊत यांनी कणेरी मठावरून झालेल्या गायींच्या मृत्यूवरून घणाघात केला. अशा पद्धतीने गायींच्या मृत्यू अन्य राज्यामध्ये निघाला असता, तर हिंदू आक्रोश मोर्चा निघाला असता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन गेल्यावर दुसऱ्या दिवशी गायींचा मृत्यू होतो. रेडाबळीप्रमाणे हा बळी आहे का ? या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, पण हे हत्याकांड असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. गायींच्या मृत्यूप्रकरणी अजूनही स्पष्टता येत नसल्याने त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी हे दबावाचं राजकारण सुरु असल्याची टीका केला.
Maharashtra budget session : निलंबनानंतर Jayant Patil आज प्रथमच विधानभवनात दाखल..
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यावर कोल्हापुरात होणाऱ्या या पहिल्या मेळाव्याला ‘शिवगर्जना’ असे नाव दिले आहे. या मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकीचे रणशिंग ठाकरे गटाकडून फुंकणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यावर या मेळाव्याच्या निमित्ताने संजय राऊत पहिल्यांदा कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह शिंदे गटात केलेल्या आजी- माजी आमदारांना लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे.