Download App

उद्या नागपूरात बॉम्ब फोडणार, संजय राऊतांची तोफ धडाडली

नागपुर : उध्दव ठाकरे साहेब आणि मी उद्या नागपूरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय.

ते म्हणाले, शिवसेना एकच असून ती शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. बाहेरचं वातावरण, शिवसैनिक महिला आघाडी सर्व जागेवर आहेत, दोन चार दलाल ठेकेदार गेले आहेत. बाकीचे कोणी नाही गेले.

उद्या आमचं सरकार आल्यास ते उद्या आमच्याकडं परत येणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. तसेच खरी शिवसेना उध्दव ठाकरेंचीच आहे. कडवट शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

सत्तर वर्षांपासून आपण सीमा प्रश्नावर लढतोय. शिवसेनने आत्तापर्यंत या सीमेसाठी हुतात्मे दिले आहेत. बेळगावशी आमचं भावनिक नातं आहे. गरज पडल्यास कधीही आम्हांला हाक मारावी आम्ही बेळगावला पोहचणार असल्याचं त्यांनी बेळगावातील लोकांना ठणकावून सांगितलंय.

दरम्यान, शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर उद्या पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाचं कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. महाविकास आघाडीची पुढील राजकीय रणनीती ठरविण्यासाठी आणि ताकद वाढविण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नागपूरमध्ये दाखल होणार आहेत.

नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी उद्या नागपूरमध्ये अनेक बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिवेशानचे पाच दिवस वादळी होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us