“नसबंदी करायची तर करा ना, तुमची राजकीय नसबंदी झाली आहे ना..” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांच्या जिभेची नसबंदी करा अशी टीका मनसेनेते संदीप देशपांडे यांनी केली होती यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या पाचोरा शहरात विविध कार्यक्रमांना उपस्थिती असून जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जळगाव आत आले असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं अन्यथा मी सभेत घुसेल असं आव्हान दिलं होत. यावर बोलताना संजय राऊत यांनी घुसून दाखवा, अस प्रती आव्हान गुलाबराव पाटील यांना दिलं आहे. एखाद्या मंत्रीपदावर विराजमान व्यक्ती अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का? असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने सत्यापाल मलिकांना नोटीस; नाना पटोलेंचा हल्लाबोल
ते पुढे बोलताना म्हणाले की राज्यात गृहमंत्र्यांचं अस्तित्व जाणवत नाही, मुख्यमंत्री मंत्रालयात आहेत ठाण्यात आहेत वर्षावर आहेत की साताऱ्यात आहेत. हेच कधी लोकांना माहीत नसतं. कायदा व सुव्यवस्था असते तर शिंदे गटातले मंत्री आमदार गुंडांसारखे उघडपणे धमक्या देत फिरले नसते. असा आरोप त्यांनी केला आहे. तर मुख्यमंत्र्यांना का राज्य चालवायचा आहे त्यांना भाजपची स्क्रिप्ट लिहून देईल, त्याप्रमाणे वागायचं आहे. आम्ही सभा घेतली की त्यांनी सभा घ्यायची आणि मोर्चा काढला की त्यांनी मोर्चा काढायचा अस सध्या सुरू आहे.
गेल्या काही दिवसापासून अजित पवार विरुद्ध संजय राऊत असा वाद रंगला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की अजितदादा पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही. ते अनेक वर्षांपासून राजकारणात आहे, अनेक वर्ष मंत्री आहेत, त्यामुळे अनेकांना वाटतं मुख्यमंत्री व्हाव, अजितदादा यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रथमच व्यक्त केली नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…
महाविकास आघाडीत कुठलीही फूट पडलेली नाही, 2024 मध्ये आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याचा प्रश्न विचारला असता ‘ते ठाकरे आहेत’ असं उत्तर त्यांनी दिल.