Download App

ठाकरेंच्या रॅलीत दहशतवादी चालतो पण पवारांनी शिंदेंचा सत्कार केलेला नाही; शिरसाटांचा निशाणा

Sanjay Shirsat ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे.

  • Written By: Last Updated:

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray after Criticize Sharad Pawar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे. त्यानंतर आता शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. त्यात आता शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.

Virat Kohli ने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ खास विक्रम

त्याचबरोबर दिल्लीतील साहित्य संमेलन आणि महदजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये गेलेल्या शरद पवारांवर टीका करणाऱ्या राऊतांनी सर्वांनाच दलाल म्हटले त्यांनी साहित्यिकांचाही अपमान केला. खरं तर संजय राऊत हेच दलाल आहेत. मात्र यावर उद्धव ठाकरे कधीही बोलत नाहीत. बाळासाहेब असते तर त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं.

अपहरणाची तक्रार का घेतली? बँकॉकला निघालेलं विमान परत कसं आणलं? आयुक्तांनी सांगितली Inside Story

दुसरीकडे उद्धव ठाकरेंना त्यांच्या रॅलीमध्ये दहशतवादी मुसा आलेला चालतो. हिरवे झेंडे चालतात. मात्र शरद पवारांनी मराठी लोकांच्या साहित्य संमेलनात गेलेलं चालत नाही. असं म्हणत शिरसाटांनी उद्धव ठाकरे यांनाही चांगलेच सुनावले आहे. तसेच यावेळी शिरसाटांनी राऊतांवरही टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, संजय राऊत हे ज्या पद्धतीने टीका करतात. ते पाहता संजय राऊत यांचे तोंड उद्धव ठाकरेंनी बंद करायला हवं.

जरांगेला फिरायला वाळू माफियांच्या गाड्या, तो सगळ्या माफियांचा आका…; नवनाथ वाघमारेंचे टीकास्त्र

दुसरीकडे शरद पवार देखील आमचे विरोधक आहेत. आम्ही देखील त्यांच्यावर टीका करतो. मात्र आम्ही या स्तरावर कधीही टीका करत नाही. शरद पवारांवर राऊतांनी त्यांनी जी टीका केली आहे. त्याचा अर्थ त्यांनी त्यांना अप्रत्यक्षरीत्या गद्दार म्हटलं आहे. तसेच याचा दुसरा अर्थ राऊतांना महाविकास आघाडीत राहायचं दिसत नाही. त्यामुळे पवारांनी ज्या राऊतांना हात धरून पुढे आणले आहे. त्यांनीच त्यांच्यावर चिखलफेक केली आहे.

follow us