Download App

माणसाने लायकी पाहून बोलावं; पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून शिरसाटांचं राऊतांवर टीकास्त्र

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Sanjay Shirsat On Vinayak Raut : कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या खात्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्लाबोल केला. उबाठाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिल्लीतील हा राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्यचा केलेला कट आहे, असा आरोप करत तुम्ही इंडिया आघाडीत या, आम्ही तुम्हाला पंतप्रधान बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ऑफर दिली. दरम्यान, राऊतांच्या या ऑफरवर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांना जोरदार कंबर कसली. मात्र, आता विनायक राऊतांनी थेट गडकरींना इंडियात येण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर प्रस्तावावर संजय शिरसाट यांना विचारले असता शिरसाट म्हणाले, कोण आहे हा खासदार विनायक राऊत? माणसाने लायकी पाहून बोलावं. स्वतःचे हे खासदार निवडून येतील का नाही हे माहीत नाही आणि हे पंतप्रधान पदाची ऑफर करतात. देशाचा नॅशनल लीडर आहे का हा विनायक राऊत ? कुणाबद्दल बोलताय याचं तर भाव ठेवा, असं शिरसाट म्हणाले.

ते म्हणाले, मी जर उठून आता अमेरिकेच्या अध्यक्षाबद्दल, देशाच्या पंतप्रधानाबद्दल बोलायला लागलो तर लोक एक्सेप्ट करतील का ? मुर्खासारखं स्टेटमेंट का करायचे ? स्वतः निवडून यायची गॅरेंटी नाही आणि देशाचे पंतप्रधान बनवायला चालले आहेत. अशा स्टेटमेंटवर लोक हसतात. संजय राऊतांच्या डोक्यावर जसा परिणाम झाला तर विनायक राऊत यांच्या डोक्यावर झाला. म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि असे स्टेटमेंट्स देणे बंद करायला हवे, अशी खोचक टीका केली आहे.

विनायक राऊत काय म्हणाले?
विनायक राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे एक नेतृत्व लोकप्रिय होत आहे. नितीन गडकरी उद्या पंतप्रधानपदाचे दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट दिल्लीच्या राजकारण्यांनी गडकरींना संपवण्याचा कट केला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेन. आमची नितीन गडकरींना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसांच पाणी दाखवावं. गडकरी त्यांना का घाबरत आहेत? त्यांनी फक्त एक आवाज द्यावा. गडकरींनी इंडिया आघाडीत यावं. आम्ही त्यांना पंतप्रधान बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी विनायक राऊतांवर घणाघाती टीका केली. त्या टीकेला आता विनायक राऊत काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज