“ऐका….सुविचार अंधारे ताईचे” व्हिडीओ पोस्ट करत शिरसाट यांनी अंधारेंना पुन्हा डिवचलं

राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दिक वाद संपता संपत नाही. मागील काही दिवसापासून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यातले वाकयुद्ध जोरदार पेटले आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या आक्षेपार्ह राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. ठाकरे गटाकडून यावर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा देखील प्रयत्न केला. पण तक्रार दाखल होत नसल्याचे पाहून […]

Sanjay Shirsat Sushma Andhare

Sanjay Shirsat Sushma Andhare

राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दिक वाद संपता संपत नाही. मागील काही दिवसापासून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यातले वाकयुद्ध जोरदार पेटले आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या आक्षेपार्ह राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. ठाकरे गटाकडून यावर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा देखील प्रयत्न केला.

पण तक्रार दाखल होत नसल्याचे पाहून सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. महिला आयोगाकडून त्यावर पोलिसांकडून उत्तर मागवले आहे. त्यातच अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा तीन रुपयांचा दावा दाखल केला. त्यामुळे पुढील काही दिवस तरी अंधारे-शिरसाट वाद मिटेल असं दिसत नाही.

Letsupp Special : ठाकरे विरुद्ध फडणवीस : लाज वाटत नाही का? ते फडतूस!

त्यातच आता त्यानंतर संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे या वादात अजून भर पडणार आहे. शिरसाट यांनी आपल्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

संजय शिरसाट यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये “आधी हिंदू देव-देवतांची टिंगल आणि आता चक्क देवीची आरती” अशी फोटोओळ लिहलेली आहे. तर या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे यांच्या जुन्या भाषणातील काही छोटे पार्ट जोडले आहेत. सोबत या व्हिडिओ सोबत “महिलांबद्दल आदर, ऐका….सुविचार अंधारे ताईचे..!!” असं कॅप्शन लिहलं आहे.

जुने व्हिडीओ पुन्हा पुन्हा चर्चेत

सुषमा अंधारे राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या जुन्या व्हिडीओ पुन्हा पुन्हा समोर आणल्या जात आहेत. याआधीही सुषमा अंधारे यांना यावरून सोशल मीडियात ट्रोल करण्यात आलं होत. आता पुन्हा त्याच व्हिडीओ शेअर केल्या जात आहेत.

Exit mobile version