Jarange Patil On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काल संयशित आरोपी वाल्मिक कराडावर (Valmik Karada) पोलिसांनी मोठी कारवाई करत मकोका लावला आहे. तर दुसरीकडे परळीमध्ये कराड समर्थकांनी वाल्मिक कराडावर मकोका लागतात परळी बंदची हाक दिली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर आता मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh) प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ते आज जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकांची घरं उध्वस्त करायची, संतोष देशमुख यांची क्रुर हत्या करायची आणि व्हिडीओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा इतका क्रुरपणा देशानं कधीच पाहिला नाही आणि त्या आरोपींसाठी आंदोलने केली जातात त्यामुळे बीडची केस अंडर ट्रायल चालवा, यात कोणीच सुटायला नको अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. तसेच खुनातील आणि खंडणीतील आरोपींना घेऊन जे पळाले त्यांना सहआरोपी करा असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, या आरोपींची नार्को टेस्ट होणं गरजेची आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीय तेढ पसरवणाऱ्या व दहशतवाद निर्माण करणाऱ्या टोळीचा समूळ नायनाट केला पाहिजे. धनंजय मुंडे आरोपी आणि आंदोलकांना भेटतात पण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला त्यांना वेळ मिळाला नाही का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच धनंजय मुंडे संतोष देशमुख यांच्या सुखी संसाराची राख-रांगोळी करणाऱ्या आरोपींना आणि आंदोलनकर्त्यांना भेटत आहे त्यामुळे त्यांच्यावर देखील संशय येणार असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.
तसेच वाल्मिक कराडची एवढी प्रॉपर्टी असूच शकत नाही. धनंजय मुंडेंनी त्याच्या नावावर प्रॉपर्टी केली आणि कराडाला गुंडगिरी करायला लावली म्हणजे मेला तर तू मर हा डाव त्यांनी साधला. असा आरोप देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
तोपर्यंत मी मागे हटणार नाही : मनोज जरांगे
या प्रकरणात आम्ही धनंजय मुंडेंचं नाव घेतले नव्हते पण धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या तेव्हापासून त्यांचे नाव घेत आहोत. इथे जातीचा संबंध नाही. धनंजय मुंडे पाप झाकण्यासाठी ओबीसींचं पांघरुण घेत आहे असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला. तसेच जेव्हापर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही आणि मी जातीय तेढ निर्माण केलेली नाही. असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून…’, विनोद तावडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
तर धनंजय मुंडे आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देतात याचा अर्थ या खुनात त्यांचा हात असल्याचा संशय येतोय. खून आणि खंडणीतील आरोपी एकच आहेत ते 302 मध्ये आले पाहिजेत आणि मकोका सुद्धा लागला पाहिजे. फरार झाल्यानंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले ते समोर आलेच पाहिजे. अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली.