Download App

उत्कंठा, घालमेल शाळेच्या पहिल्या दिवशी तशीच आज… पहिल्यांदा सभागृहात जाताना सत्यजित तांबे म्हणतात

  • Written By: Last Updated:

Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान विधपरिषदेवर निवडणूक आल्यांनतर सत्यजित तांबे यांनी आमदार म्हणून पहिल्यांदा प्रवेश केला.

त्यावेळी त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसासारख्या भावना असल्याचं ट्विट केलं आहे. उत्सुकता, उत्कंठा व मनाची घालमेल शाळेच्या पहिल्या दिवशी तशीच.. असं एक भावनिक ट्विट केलं आहे. सोबत त्यांनी विधानभवनाच्या पायरीवरील एक फोटो देखील शेअर केला आहे.

हेही वाचा : आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात ! चूक झाल्याचं सांगत म्हणाले…

आपल्या ट्विटमध्ये सत्यजित तांबे यांनी लिहलं आहे की,  “जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे. माझे आई-वडील-मामा,माझे सर्व मित्र,माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशिर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे.”

विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या संघर्षानंतर सत्यजित तांबे निवडून आले पण ते अपक्ष निवडून आल्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार कि अपक्ष राहणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्ष म्हणून निवडून आलो त्यामुळे अपक्ष म्हणून काम करणार, असं सांगितलं आहे.

Tags

follow us