पक्षाचे वरिष्ठ नेते पंकजा मुंडेंशी बोलतील, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

Devendra Fadanvis And Pankaja Munde : पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांची वैयक्तिक मते आहेत… विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यासोबत आल्याने. आमच्यातील ज्या लोकांचा राष्ट्रवादीशी संघर्ष राहिलेला आहे ते नाराज आहे हे बरोबर आहे. परंतु ते सर्व एका दिवसात स्वीकारू शकत नाहीत. हे सर्व स्वीकारण्यासारखा त्यांना वेळ लागेल. पक्षाचे […]

Pankaja Munde

Pankaja Munde

Devendra Fadanvis And Pankaja Munde : पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांची वैयक्तिक मते आहेत… विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यासोबत आल्याने. आमच्यातील ज्या लोकांचा राष्ट्रवादीशी संघर्ष राहिलेला आहे ते नाराज आहे हे बरोबर आहे. परंतु ते सर्व एका दिवसात स्वीकारू शकत नाहीत. हे सर्व स्वीकारण्यासारखा त्यांना वेळ लागेल. पक्षाचे वरिष्ठ नेते पंकजा मुंडे यांच्याशी बोलतील आणि मला विश्वास आहे की त्या आमच्या पक्षासोबत काम करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या अफवांवर भाष्य केलं. (Senior party leader will talk to Pankaja Munde, Devendra Fadnavis clearly said…)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  यांनी पक्षासोबत बंड करून भाजपसोबत हात मिळवणी केली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार सत्तेत सहभागी झाले. यातील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे पारंपारीक प्रतिस्पर्धी असणारे त्याचे चुलत बंधू धनंजय मुंडेंचा देखील सहभाग आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असून त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे वैर लपवून राहिलेले नाही. त्यातच पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. बीआरएस पक्षाकडून त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. अशातच पंकजा मुंडेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती असल्याचे समोर आले आहे. पण या बातमीला अधिकृत दुजोरा किंवा या घटनेचा पुरावा कोणीही दिलेला नाही.

आता हे पाहणं उत्सुकतेचं असेल कि खरंच पंकजा मुंडे नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करतात की आपल्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या धनंजय मुंडेंसोबत जुळून घेत आपल्या पक्षात राहतात.

 

 

Exit mobile version