Download App

‘प्रचारच नाही तर विजयी सभेलाही येणार’; उद्धव ठाकरेंचं शाहू महाराजांना वचन

Image Credit: Letsupp

Udhav Thackeray On Shahu Maharaj : मी शाहु महाराजांच्या प्रचारालाच नाहीतर विजय सभेलाही येणार असल्याचं वचन दिलं असल्याचं उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) कोल्हापूर मतदारसंघातून शाहु महाराजांना (Shahu Maharaj Chatrapati) महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलीयं. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाहु महाराजांची आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

राजकीय पक्ष कोणतेही आश्वासन देऊ शकतात का? जाणून घ्या, कसा होतो तयार निवडणुकीचा जाहीरनामा…

उद्धव ठाकरे म्हणाले, कोल्हापुरात आज शाहु महाराजांची भेट घेतली आहे. ठाकरे आणि शाहू महाराजांचे ऋणानूबंध आजोबांपासून आहेत. पुढील पिढीमध्येही ते असेच घनिष्ठ राहतील, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

“राज ठाकरेंना सोबत घेण्याची गरज नाही, त्यांच्यामुळे”.. ‘मनसे’च्या एन्ट्रीआधीच केंद्रीय मंत्र्यांचा वेगळा सूर

तसेच महाविकास आघाडीकडून महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचा प्रश्न असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. महाराजांना मी वचन दिलं आहे प्रचाराला तर येणारच विजयाच्या सभेलाही येणार असून माझाही स्वार्थ मी साधला आहे. महाराष्ट्राच्या संघर्षासाठी मी शाहू महाराजांचे आशिर्वादही घेतले आहेत. लपून काही ठेवलेलं नाही आमचं सगळ ओपन असतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेता लवकरच करणार OTTवर पदार्पण, जाणून घ्या डिटेल्स

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आलीयं. अशातच महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना थांबवून शिवसेनेच्या किंवा भाजपच्या तिकीटावर राजे समरजीतसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, घाटगे यांच्याही उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास राजघराणे विरुद्ध राजघराणे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली होती. यावेळी महाराजांनी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी दाखविली होती. मी जय पराजयाचा विचार करणार नाही, पण मूल्यांसाठी निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण सक्षमतेने उतरेन, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला होता.

follow us

वेब स्टोरीज