Shambhuraj Desai : मोठी बातमी, पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट, चर्चांना उधाण

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतलीय. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलंय. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट का घेतली? याचं कारण अद्यापही समोर आलं नाही. शंभूराज देसाई यांच्या शासकीय बंगल्यावर ही […]

Untitled Design (74)

Untitled Design (74)

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतलीय. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलंय. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट का घेतली? याचं कारण अद्यापही समोर आलं नाही. शंभूराज देसाई यांच्या शासकीय बंगल्यावर ही भेट झाल्याची माहिती आहे.
YouTube video player
शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्यामध्ये या भेटीदरम्यान सुमारे पंधारे ते वीस मिनटं चर्चा झाल्याची माहिती समोर आलंय. काही खासगी कामासाठी शंभूराज देसाईंची भेट घेतल्याचं पार्थ पवारांनी म्हटलंय. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घतली आहे.

पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला पावनगडवर जाऊन देसाई यांची भेट घेतल्याचं समोर आलंय. यावेळी पार्थ आणि शंभूराज देसाई यांच्यात पंधरा ते वीस मिनिटं चर्चा झालीय.

पार्थ पवार यांनी शंभूराज देसाईंची भेटीत काय चर्चा झाली? या भेटीमागचं कारण काय? या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. या भेटीमुळं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलंय. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या भेटीवर मोठा दावा केलाय. पार्थ हे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहेत. लोकसभेत त्यांचा पराभव झालाय. या पराभवानंतर पार्थ राजकीय स्थिरतेच्या शोधात आहेत. त्यामुळं पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

Exit mobile version