Download App

Shambhuraje Desai : ‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय’, देसाईंचा राऊतांवर निशाणा

  • Written By: Last Updated:

मुंबई :  शिवसेनेच्या ( Shivsena )  शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई ( Shambhuraje Desai )  यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे ते बोलले आहेत. संजय राऊत हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापूर व सांगली येथील सभेत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याला आता देसाईंनी उत्तर दिले आहे.

संजय राऊत यांची ग्रामपंचायत, नगरपालिका यात निवडून यायची लायकी नाही. त्यांनी आमच्यासारख्या 4 लाख लोकसंख्येच्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलणे याचा अर्थ त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशा शब्दात देसाईंनी राऊतांवर सडकून टीका केली आहे.

याआधी संजय राऊत यांनी एका सभेत बोलाताना केंद्रीय निवडणूक आयोगाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावरुन देखील देसाईंनी राऊतांना सुनावले आहे. एखाद्याला वेड लागलेला माणूसच अशी बडबड करु शकतो. रस्त्यावरुन जसा एखादा माणुस बडबड करत असतो त्यावेळी लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच प्रकारे राऊतांकडे देखील लोक आता दुर्लक्ष करत आहेत, अशा शब्दात देसाईंनी राऊतांना सुनावले आहे.

Shinde VS Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठी मुस्लिम सेवा संघाचं पत्रक, केलं ‘हे’ आवाहन

दरम्यान कसब्यामध्ये काँग्रेस जिंकली म्हणून त्याच्यापेक्षा अधिक जोशात ठाकरे गट आनंद साजरा करत आहेत. त्यांनी आधी स्वत: कुठे आहेत ते पहावे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे आता त्यांनी स्वत: चे आत्मपरिक्षण करावे असे देसाईंनी राऊतांना सुनावले आहे.

तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला, त्यावर देखील ते बोलले आहेत. या हल्ल्याचा मी निषेध करतो. मुंबई पोलिस या हल्ल्यामागे कोण आहेत त्याचा शोध घेत आहेत. लवकरच यामागील मास्टरमाईंड पुढे येईल, असे देसाई म्हणाले आहेत.

Tags

follow us