Download App

भाजपकडे बहुमत असताना ते माझ्यासारख्याचं का ऐकत होते? पवारांचा फडणवीसांना खोचक सवाल

Sharad Pawar On Devendra Fadnavis : राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule)लागू करण्याची आयडिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचीच होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केला. त्यावर शरद पवार यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी 2019 मध्ये भाजपकडे (BJP)बहुमत होतं तर ते माझ्यासारख्याचं का ऐकत होते? असा खोचक सवालही यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडणवीस चुकीची माहिती सांगत असल्याचा आरोपही यावेळी शरद पवार यांनी केला आहे.

‘राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केल्या अन्’.. फडणवीसांनी फोडलं मोठं गुपित!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना सांगितले की, Sharad Pawar On Devendra Fadnavis महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवार यांचीच होती. फडणवीस यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील या प्रकरणी शरद पवार यांच्या भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावर आता शरद पवार यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

नांदेड : 46 मृत्यू, डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा अन् केंद्रीय मंत्र्यांची रुग्णालयाला क्लीनचिट!

पवार म्हणाले की, 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेमध्ये नव्हती. Sharad Pawar On Devendra Fadnavis भारतीय जनता पक्ष सत्तेत होता. त्यांचे जास्त आमदार निवडूण आले होते. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय भाजपचाच होता. तसेच भाजपकडं बहुमत होतं तर ते मला का विचारत होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपनेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला होता. देवेंद्र फडणवीस चुकीची माहिती देत आहेत, असाही आरोप यावेळी शरद पवार यांनी केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? :
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवार यांनीच भाजपला सूचवली होती. त्यानुसार तेव्हा ती लागू करण्यात आली. त्यावेळी पवार आम्हाला म्हणाले होते की, मी एवढ्या लवकर युटर्न घेऊ शकत नाही. तुम्ही प्रथम राष्ट्रपती राजवट लागू करा.

त्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेईल. त्यानंतर आपल्याकडे पुरेसे संख्याबळ झाल्यानंतर आपसूकच महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांना पत्राद्वारे तुम्ही सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहात काय, याबाबत विचारण्यात आलं होतं., त्यानंतर हे पत्र राष्ट्रवादीलाही देण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करणार नसल्याचं मी हिलीलं ते माझ्या घरी टाईप झालं त्यानंतर पवारांनीच काही करेक्शन सांगितले होते. त्यानंतरच ते पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आलं होतं. तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us