Download App

Devendra Fadnavis हे Sharad Pawar यांना आवडत नाहीत? वाचा पवार काय म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे( NCP )  अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) या दोन नेत्यांमधील कलगीतुरा संपुर्ण महाराष्ट्र पाहतोय. काही दिवासंपूर्वीच फडणवीस यांनी पहाटेचा अजित पवारांसोबतचा शपथविधी हा शरद पवारांच्या संमतीने झाला होता, असे विधान केले होते. त्यावर पवारांनी देवेंद्र हे सुसंस्कृत नेते आहेत. ते असत्याचा आधार घेऊन खोटे बोलतील असे वाटले नव्हते, असे विधान केले होते. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कायमच शाब्दिक चकमक सुरु असते.

शरद पवारांना आज पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता. भाजपचे नेते म्हणतात की पवारांना भाजप आवडते, पण फडणवीस आवडत नाहीत. त्यामुळे पवार फडणवीसांचा राग करतात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उत्तर दिले आहे. ती सगळी लोकं मला आवडतील असं मला वाटत नाही, त्यांना मी खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांच्याशी जवळीक करुन मिठीत घ्यावे असे काही वाटत नाही, असे पवार म्हणाले आहेत.

(‘हा तर पोरकटपणा’, भावी मुख्यमंत्री पदावर Sharad Pawar थेट बोलले)

दरम्यान  शरद पवार व देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमध्ये कायम शाब्दिक टीका सुरु असते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत या दोन नेत्यांनी एकमेकांचा खरपूस समाचार घेतला होता. तेव्हापासून पवारांना फडणवीस आवडत नाहीत, अशी चर्चा ऐकायला मिळते.

गेल्या काही दिवासांपासून पुण्यामध्ये एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी शरद पवारांनी त्या विद्यार्थ्यांची मध्यरात्री भेट घेतली होती. त्यामुळे विद्यार्थी आज त्यांना धन्यवाद देण्यासाठी आले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

 

Tags

follow us