Download App

शरद पवारांचे पुन्हा पावसात भाषण ! धैर्याने पुढे जायचा सल्लाही

  • Written By: Last Updated:

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व पावसाचे अनोखे नाते आहे. शरद पवार हे पावसात भिजल्यानंतर विरोधकांना राजकीय धडकी भरते. त्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना वेगळी ऊर्जा मिळते. रविवारी पुन्हा एकदा शरद पवार हे पावसात भिजले आहेत. नवी मुंबईतील नेरुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा व महिला बचत गट मेळावा झाला. त्यावेळी पाऊस आला. या पावसात शरद पवार यांनी आपले भाषणही केले. त्यावेळी उपस्थितांनी धैर्याने पुढे जायचा निर्धार करा, असा सल्लाही पवार यांनी दिलाय.

हार्दिक गुजरातकडून अन् रोहित मुंबईकडूनच खेळणार! पहा रिलीज अन् रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

शरद पवार म्हणाले, आजचा दिवस देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली आहे. संविधान दिले आहे. त्या संविधानाचा सन्मान आजच्या दिवशी संबंध देशभर केला जाते. निसर्ग साथ असे अथवा नसो परिस्थितीवर मात करून देशातील एेक्यासाठी प्रयत्नाचा पराकाष्टा करणे हा विचार फुले, शाहू आंबेडकरांनी दिला आहे.

मराठ्यांनाच सर्वाधिक प्रतिनिधित्व; 5105 कोटीही वितरीत : आकडेवारी सांगत भुजबळांचा हल्लाबोल

आज अनेक महिलांनी संघर्षाने अतिशय चांगले स्टॉल उभे केले. परंतु अतिवृष्टीमुळे निराशा झाली आहे. पण एेवढेच सांगणे आहे. निराशा हा विचार कधीच मनात आला नाही पाहिजे. यावर मात करून धैर्याने पुढे जाण्याचा निर्धार करूया, अशी लढण्याची ऊर्जाही पवारांनी उपस्थितांना दिली आहे. चार मिनिटे पवारांचे भाषण झाले. त्यांच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, मेहबुब शेखवर इतर नेतेही उपस्थित होते.

आता धडकी कुणाला?
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांची सभा झाली होती. या सभेतही पाऊस आला होता. या पावसात भिजत शरद पवार यांनी जोरदार भाषण केले होते. या पोटनिवडणुकीत पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. पवार पावसात भिजल्याने निवडणुकीचे वातावरण फिरून उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्याची चर्चा होती. आता नवी मुंबईतही पवार भिजले आहेत. त्यामुळे येथे परिवर्तन होईल, असे काही नेत्यांना भाषणादरम्यान ओरडून सांगितले.

Tags

follow us