Download App

कार्याध्यक्षपदाबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पवारांनी सविस्तर सांगितले

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar And Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयात निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तसेच अध्यक्ष पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे असा ठराव मंजूर केला होता. या सगळ्या घडामोडी आणि जनभावनांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले मला अनेक नेते व कार्यकर्ते म्हणाले अध्यक्ष पदाबरोबर कार्याध्याक्ष पद निर्माण करू यावर मी सुप्रिया सुळेंना विचारले की तुम्ही कार्याधक्ष होणार का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या जो पर्यंत तुम्ही आहात तो पर्यंत मी पक्षाची एवढी मोठी जबादारी घेणार नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी कार्याध्यक्ष पदाला स्पष्ट नकार दिला. तसेच यावेळी बोलताना पवार म्हणाले आमच्या कुटूंबात कुठल्याही प्रकारचा वाद नाही.

अध्यक्षपद स्वीकारले तरी उत्तराधिकारी… पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मी पुनश्च: अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.

मोठी बातमी! शरद पवारांनी अखेर राजीनामा घेतला मागे; अध्यक्षपदाची कमान पुन्हा हाती

शरद पवार यांनी आज सायंकाळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयाची माहिती देताना पवार पुढे म्हणाले, लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी पक्षाचे सोडण्याचे जाहीर केले होते. 66 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.

 

Tags

follow us