Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेची ओढ का? पवारांनी केली पक्ष नेत्यांची मानसिकता उघड

प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी ) Sharad Pawar Withdrew His Resignation : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते हे भाजपच्या जवळ जाण्यासाठी का आतुर झाले आहेत? ते सत्तेबाहेर का राहू शकत नाहीत? संघर्ष करण्याची मानसिकता त्यांच्यात का रुजली नाही? याचा उलगडा खुद्द शरद पवार यांनीच केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सत्तेबाबत मानसिकता पवार यांनी विस्तृत लिखान केल आहे. […]

Untitled Design   2023 05 05T213550.384

Untitled Design 2023 05 05T213550.384

प्रफुल्ल साळुंखे,
(विशेष प्रतिनिधी )

Sharad Pawar Withdrew His Resignation : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते हे भाजपच्या जवळ जाण्यासाठी का आतुर झाले आहेत? ते सत्तेबाहेर का राहू शकत नाहीत? संघर्ष करण्याची मानसिकता त्यांच्यात का रुजली नाही? याचा उलगडा खुद्द शरद पवार यांनीच केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सत्तेबाबत मानसिकता पवार यांनी विस्तृत लिखान केल आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात पवार यांनी एवढच नव्हे तर राराष्ट्रवदी काँग्रेसच्या नेत्याच्या या मानसिकतेचे अतिशय परखडपणे विश्लेषण केलं आहे.

पवार आपल्या पुस्तकात म्हणतात, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्मच मुळात सत्तेत झाला आहे. त्यामुळे या पक्षातील नेत्याची संघर्ष करण्याची मानसिकता नाही. सरकारला विरोध करायचा या मुद्द्यावर एकमत होत पण संघर्षाची तयारी दाखवली जात नाही. ‘लोक माझे सांगाती ‘ या पुस्तकात 2014 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर का प्रभाव पाडू शकली नाही? याबाबत त्यांनी हे मत नोंदवले आहे.

अजितदादांच्या गैरहजेरीवर जयंत पाटीलही बोलले; म्हणाले, त्यांची जबाबदारी..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्यावेळी पक्ष थेट सत्तेत गेला. यात सर्व नेते युवा होते संघर्ष न करता सत्ता मिळाली. मिळाली ती सत्ता थेट पंधरा वर्ष टिकली. यामुळे पक्षातले नेते मंत्री झाले. ते जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करणे, प्रशासन हाताळणे निर्णय घेणे यात पारंगत झाले. पण जनआंदोलन आणि रस्त्यावरची लढाई म्हणजे सामान्य माणसाशी नाळ जोडली गेली नाही. विरोधी बाकावर बसल्यानंतर ही कमतरता अधिक जाणवू लागली. संघर्षाला सामोरं जाण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कधीच आली नाही. त्यामुळेच 2014 मध्ये आणि त्या नंतर राष्ट्रवदी काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरून संघर्ष करू शकले नाहीत अस सांगत पवार यांनी राष्टवाडीच्या नेत्याचे कमतरता उघड केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानपरिषदेत चोख जबाबदारी बजावली. पण विधानसभेत ही कमतरता समोर आली होती. विधानसभेच्या नेत्यांमध्ये देखील संघर्ष करण्याची क्षमता होती. पण या पक्षाचा जन्मच मुळात सत्तेत झाल्यामुळे टोकाचा विरोध करण्यासाठी नेत्यांची मानसिकता नव्हती. विरोध करण्यासाठी एकमत व्हायचं पण संघर्षासाठी कुठली मानसिकता तयार होऊ शकली नाही. या मानसिकतेचा देवेंद्र फडणवीस यांना मोठा लाभ झाल्याचे निरिक्षण पवार यांनी नोंदवला आहे.

Exit mobile version