Download App

हिंमत असेल तर निवडणुकीला उभे राहाच…शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर निशाणा साधण्याची एक संधी देखील सोडत नाही. नुकतेच शिंदे गटाचे शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी फक्त निवडणुकीला उभेच राहावे, ठाणेकर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. दरम्यान म्हात्रे यांच्या वक्त्यावर आदित्य काय बोलणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

ठाण्यातील जनक्षोभ मोर्चाला संबोधित करताना माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार” असं जाहीर आव्हान त्यांनी शिंदे यांना दिलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी समाचार घेतला आहे.

यावेळी बोलताना म्हात्रे म्हणाल्या, धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात मुंबईतल्या कार्यकर्त्यांना भरुन आदित्य ठाकरे यांनी गटागटाने पिकनिक नेली होती. या पिकनिकमध्ये आदित्य ठाकरेंनी अनेक वल्गना गेल्या, भाषणं दिली. मात्र ज्या वरळीला A प्लस वरळी करणार होते मात्र आता आपल्याला याठिकाणाहून जनाधार मिळणार नाही हे आदित्य ठाकरेंना लक्षात आले आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, ‘या’ ठिकाणी घडली घटना

३ आमदारांचा बळी घेतलेल्या वरळीतून आपण परत निवडून येणार नाही हे लक्षात आल्यावर आदित्य ठाकरे ठाण्याकडे वळले. मात्र ठाणे सुसंस्कृत आहे. तुम्ही ठाण्यातून उभे राहाच, हे ठाणेकर तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिले आहे.

मोठी बातमी ! आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टीची शक्यता

तसेच ठाण्याचा विकास हा मुख्यमंत्र्यांमुळे झाला आहे. ठाण्यात गेली २५ वर्ष जी प्रगती झाली , ती एकनाथ शिंदेयांच्या मुळे झाली आहे. तुम्ही इथं येऊन भाषण जरी दिली मात्र इथले नागरिक हुशार आहे. जे बोलतो ते करून दाखवतो हे तुम्ही दाखवून द्या. तुम्हा पिता – पुत्रांची ख्याती आहे की तुम्ही दोघे जे बोलता ते कधीच करून दाखवत नाही. म्हणून तुम्ही निवडणूक जिंकण्याचे तर सोडाच फक्त उभे राहून दाखवा असे चॅलेंज शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.

Tags

follow us