Download App

शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुठे किती टक्के मतदान? पहा आकडेवारी

Shirdi Lok Sabha : राज्यात चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत

Shirdi Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मतदान प्रक्रिया आज पार पडली. आज राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान पार पडले.  शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 55.27% मतदान झाले.  संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 57.79% मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान  कोपरगाव तालुक्यात झाले. यावेळी कोपरगाव तालुक्यात 52.92 टक्के मतदान झाले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) उमेदवार देण्यात आल्याने  या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

दरम्यान आज शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार 55.27 टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदानाच्या आकडेवारीमध्ये संगमनेर तालुक्याने आघाडी घेतली.

संगमनेर तालुक्यात 57.79% मतदान झाले होते. तर त्या खालोखाल नेवासा तालुक्यात 56.9%, शिर्डीत 56.72 टक्के, श्रीरामपूर मध्ये 54.18% अकोल्यात 53.9 टक्के तर सर्वाधिक कमी कोपरगाव तालुक्यात 52.92% असे मतदान झाले.

मोठी बातमी! होर्डिंग दुर्घटनेत चौघांचा मृत्यू , चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून आदेश

दरम्यान सायंकाळी पाच नंतर उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर अनेक मतदार केंद्रांवरती मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. अंतिम आकडेवारी आल्यानंतर अनेक तालुक्यातील चित्र अधिक स्पष्ट होणार. अद्याप निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

follow us