Download App

आमची बाजू ऐकून….; दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल

  • Written By: Last Updated:

मुंबई : दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या दोघांच्या मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गंभीर आरोप झाले होते. विधाभवन परिसरातही त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली होती. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. याप्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नेदरलँडच्या उलटफेरनं वर्ल्डकपचं कॅलक्युलेशन बदलणार का? जाणून घ्या समीकरण 

दिशा सालियान या अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या व्यवस्थापक होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पण तिची हत्या झाल्याचा आरप त्यावेळी झाला होता. त्यानंतर सहा दिवसांनी सुशांतसिंह हा देखील मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केली आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंनी यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी, अशी मागणी करत एक कॅव्हेट दाखल केलं आहे.

काय आहे याचिका?
8 जून 2020 रोजी दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच, 13 आणि 14 जून 2020 रोजीचं सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावं. तसेच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकेरंशी संबंधित सारं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं.

सुशांतच्या मृत्यूच्या वेळी आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झाले? याची चौकशी झाली पाहिजे. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्व साक्षीदारांच्या पुराव्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

दरम्यान, या प्रकरणी पुढं काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us