Download App

‘संभाजी महाराजांसारखा छळ, कारकुनाचा छळ कोणी करीत नाही’, राणे-परबांमध्ये तू-तू मैं-मैं…

महाविकास आघाडीचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात राज्यपालांवर वादग्रस्त विधान केल्याने महायुतीच्या आमदारांनी त्यांना चांगलच फैलावर घेतलंय.

Nitesh Rane On Anil Parab : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अधिवेशनात अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. अर्थसंकल्पाआधी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं चित्र आहे. एकमेकांवर होत असलेल्या आरोपांवरुन नेत्यांची वक्तव्ये चांगलीच चर्चेत आहेत. विधानपरिषदेत आज महाविकास आघाडीचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी आपली छत्रपती संभाजी महाराजांबरोबर तुलना केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होतोयं, तर दुसरीकडे संभाजी महाराजांसारखाच आपला छळ होत असल्याचा दावा अनिल परबांकडून करण्यात आलायं.

मराठी माणसात फुट पाडून झाली विभागणीही करून झाली आता… राऊतांची भैयाजी जोशींवर थेट टीका

विधानपरिषदेच्या सभागृहात बोलताना अनिल परब म्हणाले, संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स चांगलचं आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे ना..! ते राऊत साहेब गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. माझ्यावरती अन्याय आणि अत्याचार झाले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे. राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात असं वादग्रस्त विधान अनिल परबांनी केलंय.

आरोपीला भावाचा सपोर्ट, त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका…, सळईचे चटके दिलेल्या तरूणाचा आरोप

अनिल परब यांनी राज्यपालांवर वादग्रस्त विधान करताच सत्ताधाऱ्यांनी त्यांना चांगलच फैलावर घेतलंय. मस्त्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी परब यांनी कुंडलीच बाहेर काढलीयं. ते म्हणाले, महाविकास आघाडीची सत्ता असताना यांनी लोकांची घरे तोडली आहेत, तर केंद्रीय मंत्री यांना अटक करण्याचे कारनामे यांनी केले असून आता करणी तशी भरणी अंगावर आली असून हा नियतीचा खेळ आहे. कारकूनाचा खेळ कुणीही करीत नाहीत , संभाजी महाराजांची तुलना यांनी यांच्यासोबत करावी का शिवभक्तांची माफी मागा तुम्ही, असा रोष नितेश राणेंनी परबांवर व्यक्त केलायं.

दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु झाल्याने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र, सभागृहात गोंधळ उडाल्याने सभापतींना दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करावी लागलीयं.

follow us