Download App

उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पहिला वार

मुंबई : निवडणूक आयोगानं (Eleection Commission) नाव आणि पक्षचिन्ह शिंदेंना दिल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये जोरदार राजकारण सुरूंय. मंगळवारी शिवसेनेकडून (Shivsena) विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र देत शिवसेनेचा प्रतोद नेमण्याची मागणी केलीय. प्रतोदपदी विप्लव बजोरिया यांच्या नावाचा ठराव शिवसेना विधिमंडळ पक्षात झाल्याचं या पत्रातून सांगितलंय. त्यामुळं ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंकडून पहिला वार केल्याचं बोललं जातंय.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागेल अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम आहे. ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार करण्यात आलाय.

गायरान जमिनींवरील अतिक्रमण धारकांना राज्य सरकारचा दणका

अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra A ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी सुरु केलीय. विधान परिषदेत महाविकास आघाडीचं संख्याबळ अधिक असल्यामुळं मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हटलं होतं.

Tags

follow us