नागपूरः शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification Case) प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे व मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची आज फेरसाक्ष नोंदविण्यात आली. उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शेवाळे व केसरकर या दोघांना चांगलेच खिंडीत पकडले. मंत्री दीपक केसरकरांना कामत यांनी अनेक तिखट प्रश्न विचारले. परंतु केसरकर यांनी काही प्रश्नांची थेट उत्तरे देण्याचे मात्र टाळले आहे.
देवदत्त कामत यांनी विचारलेले प्रश्न आणि केसरकरांनी दिलेले उत्तरे
कामत -२१ जून २०११ रोजीचा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव दाखविण्यात आला.
जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, तर हा ठराव राज्यपालांना का पाठवण्यात आला?
केसरकर –
एकनाथराव संभाजी शिंदे यांची महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हा ठराव केला होता.
————–
कामत –
२१ जून २०२२ रोजीच्या या ठरावाच्या आधारे राज्यपालांनी ३० जून २०२२ रोजी बहुमत चाचणीचे आदेश दिले. हे खरे आहे का?
केसरकर -मला याबाबत माहिती नाही.
——
कामत –
राज्यपालांनी २८ जून २०२२ रोजी पाठवलेले पत्र केसरकर यांना दाखवण्यात आले. २१ जून २०२१ रोजीचा ठराव राज्यपालांना पाठवण्यात आला, त्यात उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या सरकारने आपला बहुमताचा आकडा गमावला आहे, अशी राज्यपालांची धारणा झाली. हे खरे आहे का?
केसरकर -हे खरे नाही.
————–
कामत -जून २०२२ मध्ये तुम्ही गुवाहाटीला कधी गेलात?
केसरकर -मला निश्चित तारीख आठवत नाही. पण २३ किंवा २४ जून २०२२ रोजी गेल्याचे आठवते.
———————-
कामत –
तुम्ही गुवाहाटीला स्वतः च्या खर्चाने राहिलात का?
केसरकर –
ही माझी वैयक्तिक माहिती आहे. ती मी उघड करू शकत नाही.
————————-
कामत –
तुम्ही विमानाची तिकिटे स्वतः काढली होती का?
केसरकर –
ही माझी वैयक्तिक माहिती आहे. ती मी उघड करू शकत नाही.
————————
कामत -तुम्ही लोकांचे प्रतिनिधित्व करत असून तुमची प्रवासाची, माहिती लपवत असल्याने तुमचा हा खर्च त्रयस्थ व्यक्तीने केल्याचे म्हणता येईल का?
केसरकर –
हे खोटे आहे
————————-
कामत –
२०१९च्या निवडणुकीत तुमचा एबी फॉर्म कोणी सही केला.
केसरकर –
मला आठवत नाही
———————-
कामत –
शिवसेना राजकीय पक्षाचे अधिकृतपणे प्रतिनिधित्व करत असलेल्या अनिल देसाई व सुभाष देसाई यांनी तुमच्या ए व बी फॉर्मवर सही केली का?
केसरकर -मला आठवत नाही
—————————
कामत –
केसरकर यांना काही कागदपत्र दाखवण्यात आले.
यावर तुमची सही आहे का?
केसरकर –
मी २१ तारखेला कुठल्याही कागदपत्रांवर सही केलेली नाही. ही सही माझी माझ्यासही सारखी आहे.
कामत यांचा आक्षेप त्यांनी ही सही केल्याचे म्हटले आहे.
शिंदे गटाचे वकिल=–तुम्ही त्यांना पूर्ण बोलू द्या. मध्येच वाक्य तोडू नका
. त्यांनी म्हटले की त्यांच्यासही सारखी आहे.
————————————-
केसरकर –
ही माझी सही आहे. पक्षाकडून अनेकवेळी वेगेवेगळ्या कागदांवर सह्या घेतल्या जायच्या आणि त्या क्रमांकासमोरच घेतल्या जायच्या. मात्र त्या काहीही मजकूर लिहिण्याआधी घेतल्या जायच्या. शिवसेना विधिमंडळ पक्ष विधानसभा सदस्यांची यादी या कागदावर हाताने पक्षादेश लिहिले जायचे. पक्ष म्हणून मी काढताना हीच प्रक्रिया राबवली जायची. त्यामुळे कुणीही या सही केलेला कागदावर काहीही लिहू शकतो.
——————————-
कामत –
भरत गोगावले यांनी ४ जुलै २०२२ रोजी तुमची पोहोच घेतली होती का?
केसरकर –
मला आठवत नाही