Sanjay Raut : मंत्रिमंडळाचा विस्तार बाजूलाच राहिला आहे. आम्ही भाजपाचे मांडलिक मुख्यमंत्री आहोत. आम्ही गुलाम आहोत हे त्यांनी (एकनाथ शिंदे) आधी स्पष्ट करावं आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. आज मात्र आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. भाजपकडे 105 चा आकडा असूनही त्यांच्यावर आज काय वेळ आली आहे. हाजी हाजी करावे लागत आहे. बेकायदेशीर आणि दुसऱ्याला मंत्रिमंडळात आणावे लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. आता राम मंदिर तयार होत आहे आणि तिथे प्रधानमंत्री जाणार आहेत. इतका मोठा इव्हेंट ते कसा सोडतील. इंडिया आघाडीला भाजप घाबरला आहे, असा दावा राऊत यांनी केला.
PM मोदींच्या दौऱ्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद; सभेला निघालेल्या बसवर दगडफेक
राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली तसेच पंतप्रधान मोदींच्या नगर दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का महाराष्ट्रात ते आधी पहावं लागेल. मोदी येताहेत विकासकामांचं उद्घाटन करणार हे मी तुमच्याकडूनच ऐकतोय. याचा अर्थ राज्यात निवडणुका होणार आहेत. सरकार बदलणार आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार यातील काहीही घडू शकतं. मोदी येताहेत ते आता साईबाबांचे दर्शन घेतील, भाषण करतील. ते स्वतःच एक मोठे बाबा आहेत. त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळतील. पाहू या काय होतंय. पण, महाराष्ट्राला काय मिळणार. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पळत दिल्लीला गेले. महाराष्ट्राची इतकी अस्थिर अवस्था याआधी कधीच झाली नव्हती.
केंद्र सरकारच मराठा आरक्षणावर तोडगा काढू शकते
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकार अद्याप यावर काहीच तोडगा काढू शकलेलं नाही. आता मोदीच यावर तोडगा काढू शकतात. केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं. मनोज जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर बसवावं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा असे आम्ही आधीच म्हणालो होतो पण, तसे काही घडत नाही. आता मोदी भाषण देऊन निघून जातील. भारतीय जनता पार्टीतील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाषणमाफिया आहेत.
Jayant Patil : ‘मोदीजी, फित कापून खुशाल श्रेय घ्या!’ ‘निळवंडे’ची आठवण सांगत जयंत पाटलांचा टोला
म्हणून मोदी वारंवार महाराष्ट्रात
पंतप्रधान मोदी वारंवार महाराष्ट्र, मुंबईचा दौरा का करत आहेत कारण, त्यांना महाराष्ट्रात आम्ही हरत आहोत. भाजप आणि त्यांचं जे काही जुगाड केलं आहे ते निवडणुकीत हरणार आहे. त्यामुळे एका भीतीतून एका निराशेतून हे दौरे सुरू आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर काही बंधनं नाहीत. पण, राज्यातील भाजप नेते त्यांना वारंवार येथे बोलावत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्याचं नेतृत्व अकार्यक्षम आणि भ्रष्ट असल्यामुळं पंतप्रधानांना इथं वारंवार बोलवावं लागत आहे