Download App

Sanjay Raut : प्रफुल्ल पटेलांचा पक्ष कोणता? राऊतांनी दिलं खोचक उत्तर

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांची काल नवी दिल्लीत नव्या संसद भवनात भेट झाली. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या भेटीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पटेल यांच्यावर मिश्कील शब्दांत टीका केली.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना या भेटीबाबत विचारले. त्यावर राऊत म्हणाले, दोघांच्या भेटीने त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांत संभ्रम पसरला आहे किंवा नाही हे त्यांनीच पहावे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतीही फूट पडणार नाही. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत हे मला माहिती नाही. पण, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत हे मला माहित आहे. शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील फुटीर गटाविरोधात निवडणूक आयोग आणि न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिकाही दाखल केली आहे, असेही राऊत म्हणाले.

Rohit Pawar : तरीही अजितदादांचे सहकारी गप्प का? रोहित पवारांना वेगळाच संशय

दरम्यान, संसदेत एका खास पोझमध्ये शरद पवारांसोबत पटेल यांनी फोटो काढून तो शेअरही केला आहे. यामध्ये पटेल यांनी शरद पवारांसह इतरही खासदार दिसत आहेत. पटेल पोस्टमध्ये म्हणाले, नवीन संसद भवनातील आजचा ऊर्जेप्रमाणे उत्साहित दिवस. राज्यसभा चेंबर खूप आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्यानं आणखीच खास बनला. कॅफेटेरियात मित्रांसह स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेत आहोत. खरोखरच आजचा दिवस लक्षात ठेवण्यासारखा आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत उभी फुट पडली. अजित पवार यांच्यासह समर्थक नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करुन सत्तेत सहभागी झाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटात प्रफुल्ल पटेलांसह सुनिल तटकरेंही सामिल आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने अजित पवार गटाकडून आमचीच राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांचा सोबत फोटो पाहिल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाचे पुन्हा मनोमिलन होणार का अशाही जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

Praful Patel with Sharad Pawar : ‘शरद पवारांसोबतचा क्षण खास’; पटेलांनी फोटो शेअर करुन व्यक्त केल्या भावना

Tags

follow us

वेब स्टोरीज